बार्शी -  सोलापूर जिल्हा दुचाकी मालक-चालक संघटना,बार्शी शाखेच्या वतीने बुधवारी दुपारी बार्शीतील बस स्थानक परिसरात स्वच्छ भारत, सुंदर भारत अभियान राबविण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष शैलेश माने, उपाध्यक्ष विजय कोरे, सचिव गुरुप्रसाद देव, बार्शी बस स्थानक आगाराचे डेपो मॅनेजर कदम, श्री.शिषलादे, श्री.बागल, श्री.सावंत तसेच दुचाकी अभियंता संघटनेच्या सुमारे ६० सदर्‍यांनी बस स्थानक परिसर अत्यंत स्वच्छ केला. या मोहिमेत सुमारे छोटा ट्रॅक्टर भरुन कचरा गोळा करण्यात आला. राज्यभरात सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेत काही ठिकाणी केवळ फोटो पुरते हाती खराटा घेऊन छायाचित्र रंगविण्यात आल्याचे उघड झाले असतांना, बार्शीतील अभियंत्यांनी कोणतीही लाज न बाळगता अत्यंत गलिच्छ वातावरणातील स्वच्छता केली.
    बार्शीतील बस स्थानक या अत्यंत घाणेरड्या झालेल्या परिसरात चांगल्या प्रकारची स्वच्छता झाल्यानंतर अनेकांनी कौतुक केले. त्यांचा आदर्श घेऊन इतर सामाजिक संघटनांनी शहरातील स्वच्छता मोहिम राबविल्यास वेगळा आदर्श निर्माण होण्यास मदत होईल.

 
Top