बार्शी - पंचमवेद नाट्यसंस्था सोलापूर यांनी सादर केलेल्या स्विंग या नाट्यप्रयोगात विविध प्रकारच्या स्वभावाची व आवडी निवडीची माणसे समाजामध्ये एकत्रपणे वावरत असतांना प्रत्येकातील स्वार्थ, अडचणी, पैशाची गरज, वागण्यामुळे होणारे परिणाम, विचारातील बदल मानसाचे आयुष्य बदलून टाकते व मनातील स्वप्नांची पूर्तता होते. माणूस श्रेष्ठ की पैसा या प्रश्‍नाचे उत्तर. प्रेम, विश्वास, त्याग, एकता यांच्यामुळे सुटलेले प्रश्‍न. यांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
    या नाटकातील पात्र ऋतुराज आरसिद, सूरज कोडमूर, सौरभ कुलकर्णी, सुमित चोळ्ळे, संजीव शेंडे यांनी साकारले आहे. लेखक, दिग्दर्शक सूरज कोडमूर, नेपथ्य मयुरेश देशमुख, पार्श्‍वसंगीत विपुल आरसीद, प्रकाश योजना शिवानंद करुटे, रंगमंच व्यवस्था तानाजी होटकर, अरुण कोरुळकर यांनी केले आहे.
     एका रुममध्ये वास्तव्य करीत असलेल्या ऋतुराज, अरुण, मयुरेश, सूरज यांच्यात अनेक चांगले गुण असले तरी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या आवडी व एकमेकांवर असलेली इर्षा. आयुष्यातील भविष्याचा विचार करणारी स्वप्ने पाहतांना स्वत:च्या स्वार्थाशिवाय इतरांकडे न पाहणार्‍या चारही मित्रांना मोबाईलवर मेसेस येतो. यामध्ये मनोरंजन खेळासारख्या एका स्पर्धेत विजयी होणार्‍यास दहा कोटी रुपये मिळणार असल्याची जाहीरात असते. त्यानुसार ते चारही जण त्यामध्ये सहभागी होतात. यचत एकएक करुन प्रत्येकाच्या मनातील इच्छेनुसार घटना सत्यात उतरवतांना इतरांनी त्याला मदत करायची असे सांगण्यात येते. यावेळी त्यांना एकमेकांच्या स्वभाव गुण़-दोष, विषयाचे गांभीर्य, नेमके कोणत्या वेळी काय करायला हवे याचे आकलन होते. यात त्यांना इतरांकडून मनापासून होणारी मदत यामुळे त्यांचा एकमेकांवरील विश्वास दृढ होतो. स्पर्धेच्या दुसर्‍या राऊंडमध्ये त्यांच्या हातात पिस्तूल देऊन इतरांचा जीव घेण्यास सांगण्यात येत यावेळी त्यांच्या मनातील झालेले परिवर्तन, पूर्वी एकमेकांच्या जीवावर उठू शकतील इतके स्वार्थी, एकमेकांचे स्पर्धक असलेले चार मित्र एकमेकांच्या जीवाची काळजी करतांना दिसून येतात. ते चारही जण आमच्यातील कोणाच्या जीवाच्या बदल्यात आम्हाला दहा कोटी रुपये नको असे म्हणतात. यानंतर स्पर्धा आयोजकांनी दिलेली पिस्तुल त्यांच्यावर रोखण्यात येते यावेळी ते पिस्तुल नकली असल्याचे सांगण्यात येते. यावेळी माणसाचे विविध स्वभाव वेगवेगळ्या घटनेत त्याच्याकडून होणार्‍या घटना, प्रसंगानुसार त्याच्याकडून होणार्‍या कृतींचा अभ्यास करणारे हा मनो वैज्ञानिक तज्ञांचा प्रयोग असल्याचे सांगण्यात येते.
    शंभर दिवस मैत्री असलेल्या माणसांचे एक दिवस पटत नाही. यावेळी तो शंभर दिवस विसरतो. इतरांच्या आवडी निवडी, भिन्न सवयी यांचा तुम्ही विचार केल्यास ते सर्वजण तुमच्या यशाचे वाटेकरी ठरतात व तेच तुमच्यासाठी मदतीला धावून येऊ शकतात. याचा उलगडा यामध्ये करण्यात आला आहे.


 
Top