उस्मानाबाद - जिल्ह्यास नोव्हेंबर- 2014 महिन्यासाठी  100 टक्के केरोसीनचा कोटा प्राप्त झाला आहे. सदर केरोसीन वितरणात गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेऊन, विक्रेत्यांकडील शिल्लक साठयाची  माहिती दरमहा 28 तारखेला न चुकता सादर करावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत.
    तहसीलदारांनी महिनाभरात कधीही दुकानात केरोसीन मिळेल, यादृष्टीने केरोसीन परवानाधारकांना कोटा उपलब्ध  करुन द्यावा. तसेच दरमहा तालुक्यातील संबधित गॅस एजन्सीकडून एक गॅसधारक/ दोन गॅसधारकांची यादी घेवून शिधापत्रिकेवर स्टॅंपिंग न करता किरकोळ परवानाधारकास कमी जास्ती नियतन देण्यात आल्यास त्यास सर्वस्वी तहसीलदार जबाबदार धरण्यात येईल
            तसेच कंपनी एजटांनी तीन दिवसाच्या आत रक्कम अर्धघाऊक/किरकोळ परवानाधारकांकडून जमा करुन घेवून  केरोसीनचे वितरण करावे.  परवानाधारकांनी सदरची रक्कम कंपनी  एजंटाकडे  आदेश निघाल्यापासून तीन दिवसाच्या आत जमा करुन केरोसीनची मागणी करावी. केरोसीन कंपनी एजंटांनी कोटा तालुकानिहाय वाटप करीत असताना वाटपासाठी पाठविलेले टँकर प्रथम तहसील कार्यालयात  हजर करावे. टँकर ट्रकिंग सिस्टमनुसार तहसीलदार यांनी  निर्देश देतील त्याप्रमाणे तहसील कार्यालयाच्या प्रतिनिधी समक्ष केरोसीनचे वाटप करावे. केरोसीन वितरणाची कार्यवाही सायंकाळी 6 वाजेपर्यंत करावी. सुर्यास्तानंतर केरोसीनचे  वाटप करु नये.   
केरोसीन कंपनी, एजंट, अर्धघाऊक, किरकोळ विक्रेत्यांनी त्यांना देण्यात आलेला केरोसीन कोटा 25 तारखेपर्यंत 100 टक्के नियतन उचल करुन वाटपाची कार्यवाही पूर्ण करुन वाटपाचा पाक्षीक अहवाल दरमहा 17 व 27 ताररखेपुर्वी  सादर करावा. कोटा मुदतबाहय उचल केला जाणार नाही किंवा  व्यपगत होणार नाही, याची सर्व संबधितांनी दक्षता घ्यावी. सर्व केरोसीन कंपनी एजंटानी केरोसीनचा कोटा 25 ताररखेपूर्वी उचल करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले आहेत.
 
Top