नळदुर्ग- भोई समाज क्रांती दलाची राज्‍यस्‍तरीय बैठक रविवार‍ दि.16 नोव्‍हेंबर रोजी दुपारी बारा वाजता नागपुर येथील विभागीय मच्‍छीमार सहकारी संघाचे कार्यालय जे. सी. बर्वे मार्ग सिव्‍हील लाईन झिरो माईल स्‍टोन नागपुर येथे आयोजीत करण्‍यात आली आहे.
     संघटनेचे प्रदेश अध्‍यक्ष भाऊसाहेब बावने यांच्‍या मार्गदर्शनाखाली सपन्‍न होणा-या या सभेत संघटनेचे राज्‍यव्‍यापी अधिवेशन घेण्‍याबाबद व समाजाला अनुसुचित जातीच्‍या सवलती मिळाव्‍यात म्‍हणुन महाराष्‍ट्र सरकारने कॅबिनेट च्‍या मिटींग मध्‍ये ठरावघेवुन केंद्र सरकारकडे शिफारस करण्‍या बाबद मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या सोबत चर्चा करण्‍याबाबत विचार विनिमय करण्‍यात येणार आहे सोबतच संघटनेचे 22 ऑगष्‍ट 14 रोजी राज्‍भर केलेल्‍या आंदोलना बाबत आढावा घेण्‍यात येणार आहे भोई समाज क्रांती
दलाने भारतीय जनता पारर्टीला लोकसभेत तथा व‍िधानसभेत शर्थी व अटी‍स अधिन राहुन पाठिंबा दिलेला आहे त्‍या संर्दभात भारतीय जनता पार्टी ने संघटनेला लेखी हमी सुध्‍दा दिलेली आहे सध्‍या महाराष्‍ट्रात व केद्रात भाजपाची सरकार असुन पक्षाने दिलेला शब्‍द न पाळल्‍यास संघटना राज्‍यस्‍तरावर आंदोलन करण्‍याबाबतची भुमीका नागपुर येथील सभेत ठरविणार असल्‍याचे संघटनेचे अध्‍यक्ष भाऊसाहेब बावने यांनी म्‍हटले आहे रवि‍वारी नागपुर येथे संपन्‍न होणा-या सभेत क्रांती दलाच्‍या सहयोगी संघटना भोई समाज युवा मंच, भोई समाज महिला मंच, भोई समाज कर्मचारी परिषदेचे महाराष्‍ट्राचे अध्‍यक्ष तथा सरचिटणीस यांना सुध्‍दा
आमंत्रीत करण्‍यात आले असुन क्रांती दलाचे जिल्‍हाध्‍यक्ष तथा प्रदेश कार्यकारणी व क्रां‍तीदलाच्‍या सर्व पदाधिका-यांनी हजर राहावेअसे आवहान जिल्‍हाध्‍यक्ष विशाल डुकरे यांनी केले आहे.
 
Top