नळदुर्ग -  येथील इतिहास प्रसिध्‍द किल्‍ल्‍यामधील  शेतीवर झालेले अतिक्रमण दुर करण्‍याबाबत प्रशासनाच्‍या हालचाली गतीमान झाल्‍याची चर्चा  होत आहे.   ऐतिहासिक नळदुर्गचा किल्ला सोलापुराच्‍या युनिटी मल्टीकॉन कंपनीला दहा वर्षांसाठी देण्यात आला असून  महाराष्ट्र शासन, पुरातत्त्व विभाग व  युनिटी मल्‍टीकॉन कंपनी यांच्यात बीओटी तत्‍वावर  देण्‍याबाबत दोन महिन्‍यापूर्वी  याबाबतचा करार झाला आहे.  तत्‍कालीन पालकमंत्री व विद्यमान आमदार  मधुकरराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे पर्यटनवृद्धीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. म्‍हणून भविष्‍यात नळदुर्ग टुरिझम स्पॉट म्हणून सर्वश्रुत हाईल.
       नळदुर्ग येथिल ऐतिहासिक किल्‍ला  प्राचीन असून या किल्‍ल्‍यात अनेक प्रेक्षणिय स्‍थळे आहेत. या किल्‍ल्‍यातील नयनरम्‍य नर - मादी धबधबा पाहण्‍यासाठी राज्‍यासह परप्रांतातुन लक्षावधी पर्यंटक दरवर्षी किल्‍ल्‍यास भेट देतात. मात्र याठिकाणी येणा-या पर्यंटकासाठी सुविधा नसल्‍याने किल्‍ला पाहण्‍यासाठी येणा-या पर्यंटकाना मोठी कसरत करावी लागते.त्‍यामुळे पर्यटकातुन नाराजी व्‍यक्‍त केली जाते. त्‍याचबरोबर नर-मादी धबधबा सुरू  असतानाच किल्‍ला पाहण्‍यासाठी पर्यटकंची अक्षरशा रिघ लागते.
या ठिकाणी पर्यटकांना म्‍हणावी तशी सोयी -  सुविधा उपलब्‍ध नाही. त्‍यात प्रामुख्‍याने किल्‍ल्‍यापर्यंत पोहचण्‍यासाठी प्रशस्‍त रस्‍ता नाही. त्‍याचबरोबर किल्‍ल्‍यामध्‍ये प्रवेश द्वराबाहेर अतिक्रमणचा विळखा आहे. अरूंद रस्‍ते यासह अनेक गैरसोयी निर्माण झाल्‍याचे दिसून येत आहे. या किल्‍ल्‍यामध्‍ये शासकीय मालकीची शेत जमीन असून त्‍यावर काहींनी अतिक्रमण केल्‍याचे निदर्शनास आले असून याप्रकरणी सदरील शेतजमिनीबाबत प्रशासनाच्‍या वतीने चौकाशी करण्‍यात येत असल्‍याची जोरदार चर्चा होत आहे.  
  युनिटी मल्टीकॉन  कंपनीचे व्‍यवस्‍थापकीय संचालक कपिल मौलवी यानी पुढारीशी बोलताना सांगितले की, राज्‍याचे तत्‍कालीन  'सांस्कृतिक मंत्री संजय देवताळे, तत्‍कालीन  पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, पुरातत्त्व विभाग महाराष्ट्राचे संचालक संजय पाटील, भारत जैन, जयधवल शहा, अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थित मुंबई येथे सप्‍टेंबरमध्‍ये बीओटीच्या या करारावर सहय्या करण्यात आल्या आहेत. नळदुर्गचा हा ऐतिहासिक किल्ला प्राचीन असून या किल्ल्यामध्ये अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत.
येथील नर-मादी धबधबा हा पर्यटकांना  आकर्षित करणारा केंद्रबिंदू  आहे. बीओटीच्या माध्यमातून किल्ल्यामध्ये अत्याधुनिक ऐतिहासीक संग्रहालय, ऐतिहासीक वाचनालय, उद्यान, बालकासह सर्वांना मनोरंजनात्‍मक आकर्षित करणारे खेळणी, रोझ गार्डन तसेच लेझर शोच्या माध्यमातून किल्ल्याचा इतिहास मांडण्याबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहे. तर लहान मोठया उद्योग धंद्यास चालना मिळणार आहे. त्‍याचबरोबर अनेक बेरोजगाराच्‍या हातांना काम मिळेल अशी आपेक्षा व्‍यक्‍त केली जात आहे.
 
Top