उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेतर्फे इयत्ता 4 थी , 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा,विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेची आवेदनपत्र केवळ ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येणार असून  या परिषदेच्या www.mscepune.in  या संकेतस्थळावर सविस्तर माहिती व सूचना  व वेळापत्रक प्रसिध्द करण्यात आली आहे. शाळांना नोव्हेंबरपासून ऑनलाईन आवेदनपत्र भरता येणार असून नियमीत शुल्कासह 4 डिसेंबरपर्यंत आवेदपत्र भरण्याची मुदत देण्यात आली आहे.
          परीक्षेची तारीख  रविवार 22 मार्च,2015 असून परीक्षेचे नाव पुर्व माध्यमिक ‍शिष्यवृत्ती परीक्षा, शासकिय विदयानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुकत जाती व भटक्या जमाती विदयानिकेतन प्रवेश परीक्षा सर्वपरीक्षा इ 4 वीसाठी , ब माध्‍मिक शाळा  शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7 वीसाठी आहे. परीक्षेचे माध्यम मराठी, उर्दु, हिंदी, गुजराथी, इंग्रजी, तेलगू सिंधी व कन्नड या आठ माध्यमातून घेतली जाणार आहे.
              पूर्वमाध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा विदयानिकेतन प्रवेश परीक्षा महाराष्य्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व परीक्षा परिषद (एससीआरटी), पुणे यांच्या इयत्ता 1 ते 4 च्या अभ्यासक्रमावर घेलली जाणार आहे, माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परीषद एमएससीआरटी, पुणे यांच्या इयत्ता 1 ते 7 च्या अभ्यासक्रमावर घेतली जाणार आहे. शिष्यवृत्तीसाठी  पात्रता- राज्य शासनाचा अभ्यासक्रम एससीआरटी) राबविणाऱ्या शाळांतील विदयार्थी गुणवत्तेनुसार    शिष्यवृ
त्तीस  पात्र  ठरतील. सीबीएसई / आयसीएससी अभ्यासक्रमाच्या शाळांतील विदयार्थी परीक्षेस बसू शकतील. मात्र  त्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार नाही.  उर्वरीत निकष संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. परीक्षेचे स्वरुपी एम स एस व एचएसएससाठी प्रत्येकी तीन प्रश्नपत्रिका असून सर्व प्रश्न वस्तूनिष्ठ बहुपर्यायी असतात.
            शिष्यवृत्ती संच इयत्ता 4 थी करीता प्रकारचे 16 हजार 683 इयत्ता 7 वी साठी 16 हजार 578 शिष्यवृत्ती  संच मंजूर असून एखादा विदयार्थी  पूर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्तीसाठी व विदयानिकेतन प्रवेशासाठी  गुणवत्तेनुसार पात्र ठरल्यास दोहोचा लाभ दिला जातो. शुल्क- ऑनलाईन आवेदनपत्र नोंदणी शुल्क रुपये 10 सर्व विदयार्थ्यांसाठी, ब. परीक्षा शुलक रुपये 50 महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळेतील मागासवीर्गय एस.सी, एस  टी, व्हीजेएनटी या प्रवर्गाना परीक्षा शुल्क नाही. क. शाळा संलग्नता शुल्क रु 200  4वी, 7वी शिष्यवृत्ती  एन टी एस व एन एम एम एस परीक्षेसाठी मिळून, आवेदन पत्र भरण्याची पध्दत केवळ ऑनलाईन पध्दतीनेच आवेदपत्र शाळेमार्फत भरावयाची आहे. संकेतस्थळ www.mscepune.in मदत कक्ष मोबाईल क्रमांक 7774012455, 777401256 ई मेल आयडी-mscepune@gmail.com.आणि Msshss.msce@gamil.com
             आवेदनपत्र भरण्याबाबतच्या ठळक बाबी-परीषदेकडून लाइन आयडी व पासवर्ड मिळाल्यानंतर शाळेने सर्वप्रथम शाळा  माहिती प्रपत्र school profile भरणे आवश्यक आहे. शाळा माहिती प्रपत्र school profile भरुन confirm केल्यानंतरच विदयाथ्यांची आवेदनपत्र भरता येणार आहे. ऑनलाइन चलनाची प्रिंट घेवून  बँकेत शुल्क भरल्यानंतर शाळेने चलन अपडेट करणे आवश्यक आहे. विदयार्थ्याचे आवेदनपत्र प्रिंट काढण्याची आवश्यता नाही. परीक्षेची आवेदनपत्र भरलेल्या विदयार्थ्याची यादी प्रपत्र अ. असल्‍यास प्रमाणपत्र पालकांचे उत्पन्न 20 हजारापेक्षा कमी असल्याचे प्रमाणपत्र, पालक भूमिहीन शेतमजूर असल्याचे प्रमाणपत्र व शुल्क भरण्‍याचा चलनाची प्रत एमएससीइ कॉपी केंद्र प्रमुखांमार्फत
गट शिक्षणाधिकारी / वार्ड आफीसर यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे.  
              आवेदनपत्रासाठी विदयाथ्यांच्या फोटोची आवश्कता नाही. मात्र जानेवारी महिन्यात प्रवेशपत्रावर हॉली तिकीट लावण्यासाठी आयडेंटी आकाराचे फोटो तयार ठेवणे आवश्यक आहे. पूर्वमाध्यमीक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा व विदयानिकेतन शासकीय, आदीवासी, विमुक्त जाती व भटक्या जमाती, प्रवेश परीक्षा यासाठीच एकच आवेदपत्र आहे. त्यात विदयानिकेतन प्रवेशासाठी पात्र विदयार्थ्यांना विकल्प देण्यात आला आहे.
              आवेदनपत्र भरण्याचे वेळापत्रक यानुसार आहेत. नियमित शुल्कासह इ. 4 थी / 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा, विदयानिकेतन शिष्यवृत्ती परीक्षा आवेदनपत्र भरणे, ऑनलाईन चलनाची प्रिंट घेणे 1 नोंव्हेंबर ते 4 डिसेंबर, चलनाव्दारे बँकेत शुल्क भरणे  5 डिसेंबरपर्यंत, चलन अपडेट करणे व प्रपत्र अ. ची प्रिंट घेणे 8 डिसेंबरपर्यंत, प्रपत्र, अ. सोबत आवश्यक प्रमाणपत्रे, शुल्क भरल्याच्या चलनाची प्रत एमएससीई कॉपी केंद्र प्रमुखामार्फत गट  शिक्षणाकारी/ वार्ड आफीसरकडे जमा करुन पोच घेणे 9 डिसेंबरपर्यत आहे.
            विलंब शुल्कासह - इ. 4 थी / 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा, विदयानिकेतन शिष्यवृत्ती परीक्षा आवेदनपत्र भरणे, 5डिसेंबर ते 19 डिसेंबर, चलनव्दारे बॅकेत शुल्क भरणे 5 डिसेंबर ते 20 डिसेंबर, चलन अपडेट करणे व प्रपत्र अ. ची प्रिंट घेणे 5 ते 22 डिसेंबर, प्रपत्र, अ. सोबत आवश्यक प्रमाणपत्रे, शुल्क भरल्याच्या चलनाची प्रत एमएससीई कॉपी केंद्र प्रमुखामार्फत गटशिक्षणाकारी/ वार्ड आफीसरकडे जमा करुन पोच घेणे.5 ते 23 डिसेंबर आहे.‍
          अतिविलंब शुल्कासह इ. 4 थी / 7 वी शिष्यवृत्ती परीक्षा, विदयानिकेतन शिष्यवृत्ती परीक्षा आवेदनपत्र भरणे, ऑनलाईन चलनाची प्रिंट घेणे, चलनाव्दारे बॅकेत शुल्क भरणे, चलन अपडेट करणे व प्रपत्र अ. ची प्रिंट घेणे, प्रपत्र अ सोबत आवश्यक  प्रमाणपत्रे, शुल्क भरल्याची चलनाची प्रत एमएससीई कॉपी केंद्र प्रमुखामार्फत गट  शिक्षणाधिकारी/ वार्ड आफीसरकडे जमा करुन पोच घेणे. 20 डिसेंबर ते परीक्षेपूर्वी  15 दिवस अगोदरपर्यत 
 
Top