उस्मानाबाद - स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार   प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबादच्या संयुक्त विदयमाने ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील 18 ते 45 वयोगटातील पुरुषासाठी येथील राजे कॉम्पलेक्स 3 रा मजला, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद येथे 13 नोंव्हेंबर ते 12 डिसेंबर या 30 दिवसाच्या कालावधीसाठी  मोबाईल रीपेरिंग/दुरुस्तीचे  प्रशिक्षण  आयोजित करण्यात आले आहे.
 या प्रशिक्षणात बेसीक इलेक्ट्रानिक्स प्रस्तावना, पॉवर, व्होल्टेज थेयरि डिजीटल मल्टीमीटरचा वापर, कोईल, सर्कीट, बोर्डची तपासणी, डीसप्ले याविषयी तक्रारी सेलफोनची ओळख, हार्डवेअर व सॉफटवेअर व मदर बोर्ड किप्याडची ओळख, सीमच्या तक्रारी, फॉल्ट, ओळखणे,आदि निष्णात प्रशिक्षकाव्दारे थेअरी व प्रक्टील प्रोजेक्टरव्दारे ‍शिकविले जाणार आहे.
प्रशिक्षणाच्या कालावधीत स्टेशनरी, जेवण्याची व राहण्याची व्यवस्था संस्थेमार्फत विनामुल्य सोय  केली असून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वत:चा व्यवसाय सुरु होईल व स्वात:च्या पायावर उभे राहाल. तरी इच्छुक पुरुषांनी या सुवर्ण संधीचा लाभ घेवून  स्वयंरोजगाराची निर्मीती करुन स्वालंबी व्हावे, असे आवाहन संस्थेचे संचालक राजन चुंबळे यांनी केले आहे.
प्रवेशासाठी ग्रामसेवकाचा दारीद्रय रेषेखाली असल्याचा दाखला, रेशनकार्ड किंवा रहिवाशी दाखला, वय व शैक्षणिक पात्रतेसंबधी शाळा सोडल्याचा दाखला, बोनाफाइड सर्टिफिकेट, मार्कलीस्ट, आयडेटेंटी साईज 5 फोटो   आदि कागदपत्रासह व्यक्तीश: भेटावे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी 9763624998, 7030320255, 9923069923, 9552858521 वर संपर्क साधून प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा,असेही  कळविण्यात आले आहे.
 
Top