बार्शी -  महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेतील बार्शी केंद्रात कुर्डूवाडी युवक बिरादरी,कुर्डूवाडी या संघाने वसंत कानेटकर लिखित गोष्ट जन्मांतरीची हे सादर करण्यात आले. या नाटकात पूर्वजन्मातील मृत्यूयोगाचे सातत्य व त्यावर उपाययोजनेचा भाग म्हणून विचारशक्तीच्या जोरावर दुरुस्ती करुन अघटीत घटना टाळता येतात असे विचार प्रकट करण्यात आले आहेत. या तीन अंकी नाटकात मोहन खरात (संभाजी झेंडे-पाटील), सीमा चांदेकर (माणिक सातपुते), डॉ.संतोष सुर्वे (रविराज सामंत), भगवान बागल (नेमीनाथ लिखिते), विनय दहिवाळ (ईश्‍वरा), बाळ निमसुडकर (डॉ.विश्वामित्र), दत्ता वाघमारे (दयानंद कोलारकर), आशा पासलकर (प्रफुल्ला कोलारकर), सूर्यकांत भोरे (हरिप्रसाद) यांनी अभिनय केला आहे.
    पूर्वजन्मातील राजाची पत्नी त्याला सोडून तिच्या प्रियकरासोबत दिसल्यामुळे तिची केलेली हत्या, पूर्वजन्मातील घटनाक्रमात झालेल्या चुकांची दुरुस्ती काय करायला हवी होती व कोणता अनर्थ टळला असता असे डॉ.विश्वामित्राच्या अभ्यासावरुऩ काढलेले निष्कर्ष. त्याच घटना पुन्हा घडतांना दर्शवून गणितीय व इतर अभ्यासावरुन तंतोतंत भविष्य सांगणार्‍या ज्योतिषाप्रमाणे विविध घटना सांगणारे डॉ.विश्वामित्र. नंतर होणार्‍या घटना विश्वामित्राने सांगील्यानंतर सातत्याने घडत असल्याचे पाहून आश्‍चर्यचकित होणारी इतर पात्रं. काही कालावधीनंतर प्रफुल्लाच्या मृत्यूयोगाची चाहूल लागल्याने अस्वस्थ झालेला विश्वामित्र, त्यातून सुटण्याचा मार्ग काढण्यासाठी सातपुते हिला कोणता निर्णय घेतल्यानंतर पूर्वजन्मातील नेमक्या घडणार्‍या घटनेच्या चक्रातून सर्व जणांची सुटका झाल्याचे सांगण्यात येते.
 
Top