उस्मानाबाद - शेतक-यांच्या जमीन मोजणीसंदर्भात अनेक अडचणी असतात. हद्दीवरुन भांडणेही होतात. अशावेळी जमीनीची शासनामार्फत मोजणी झाली तर त्याचा लाभ गावक-यांना होऊन गावातील तंटेही कमी होतील या उद्देशाने राज्यातील पहिल्या डिजीटल जमीन मोजणी कार्यक्रमाचा शुभारंभ उस्मानाबाद तालुक्यातील सकनेवाडी येथे अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्या हस्ते झाला.
         याप्रसंगी भूमापक, तलाठी, सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत या मोजणीस प्रारंभ झाला.महसूल विभागामार्फत सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत विविध योजना, उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. विविध प्रमाणपत्र, दाखल्यांचे वाटप, पाणंदमुक्ती, समाधान मेळावे अशा माध्यमातून महसूल प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण गावातील जमीन मोजणी उपक्रमाचा शुभारंभ अपर जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आला. उपविभागीय अधिकारी, उस्मानाबाद अभिमन्यू बोधवड, उमरग्याचे उमरगा व कळंबचे उपविभागीय अधिकारी सर्वश्री रवींद्र गुरव, सचिन बारवकर, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी  मगर, आठही तालुक्यांचे तहसीलदार सर्वश्री रामहरी गोरे, वैशाली पाटील, यु. व्ही. सबनीस, ज्योती चव्हाण, स्वरुप कंकाळ,  अरविंद बोळंगे, काशीनाथ पाटील आणि प्र. तहसीलदार राजेश जाधव, आठही तालुका भूमी अभिलेख अधिकारी, सकनेवाडीचे सरपंच दयानंद भोईटे, उपसरपंच रामलिंग घायतिडक आदींची उपस्थिती होती.
यावेळी अपर जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी या ई-मोजणी उपक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सकनेवाडीपासून या उपक्रमास सुरुवात झाली आहे. सकारात्मक पद्धतीने गावकऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने या गावाची निवड करण्यात आली आहे. गावची कुटुंबसंख्या 148 इतकी आहे. जवळपास येत्या 23 नोव्हेंबरपर्यंत गावातील सर्व मोजणी पूर्ण केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हास्तरावरील या कार्यक्रमासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आठ पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यात तहसीलदार, तालुकास्तरीय भूमी अभिलेख अधिकारी, भूमापक, चार तलाठी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथक प्रत्यक्ष शेतात जाऊन ही मोजणी करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.
गावकऱ्यांनी विविध योजनांसाठी पुढाकार घ्यावा, तंटामुक्त आणि निर्मल ग्राम करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
उपविभागीय अधिकारी श्री. गुरव यांनी जमीनीच्या हद्दीचे वाद यामुळे संपतील आणि गा
उपविभागीय अधिकारी श्री. बोधवड यांनी सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.
उपविभागीय अधिकारी श्री. बारवकर यांनी या अभियानामुळे महसूल प्रशासन गतीमान झाल्याचे सांगितले.
या एकत्रित शेतजमीन मोजणीमुळे आपापसात होणारे वाद मिटण्यास मदत होणार आहे. सध्या शासन अथवा न्यायालयात शेतकऱ्यांच्या जमिनीसंदर्भातील तक्रारींचे प्रमाणच सर्वाधीक असते. त्यामुळेच प्राथमिक पातळीवर प्रायोगिक स्तरावर या कार्यक्रमास आज सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे आभार श्री. जाधव यांनी मानले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                                                 
वात एकप्रकारे चांगले वातावरण राहील, असे नमूद केले.
 
Top