उस्मानाबाद - येथील भारत स्काऊटस् आणि गाईडस् जिल्हा कार्यालयात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस जिल्हा चिटणीस मुकुंद राजेनिंबाळकर व जिल्हा संघटक आयुक्त (स्काऊट) जनार्दन इरले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यावेळी सुनील घोगरे, श्रीमती काझी सयीदानसरीन, राजाराम मगर, दत्ता माने, श्रीमती अनुसया सिरसाठ यांच्या
    याप्रसंगी श्री. राजेनिंबाळकर यांनी सरदार पटेल यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. सकाळी रन फॉर युनिटी अर्थात एकता दौडचे आयोजन करण्यात आले. तसेच सार्वजनिक स्वच्छता अभियानात स्काऊट –गाईडचे विद्यार्थी, रोव्हर-रेंजर विद्यार्थी तसेच पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
सह स्पर्धा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थ्यांची  उपस्थिती होती.
 
Top