उस्मानाबाद,- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, उस्मानाबाद येथे राष्ट्रीय लोक अदालत प्रमुख जिल्हा न्यायाधिश सुरेंद्र तावडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.
    यावेळी पोलीस अधिक्षक अभिषेक त्रिमुखे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचचे अध्यक्ष एम. व्ही. कुलकर्णी, स्थानिक सर्व न्यायीक अधिकारी, विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष आर. एस लोमटे, विविध महसूल अधिकारी, बँक कर्मचारी, प्रतिनिधी, विमा कंपन्याचे विभागीय  अधिकारी, पक्षकार ,विधीज्ञ, कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
    लोकअदालतीमध्ये  दिवाणी 582 व फौजदारी  211 धनादेशाची प्रकरणे-47 मोटार अपघाताची प्रकरणे-30, कामगार नुकसान भरपाईचे-2 आणि विदुयत महावितरणचे एक प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. यात मोटार अपघात प्रकरणामध्ये भरपाई रक्कम रुपये 1 कोटी तीन लाख दहा हजार मंजूर करण्यात आले तर दुरसंचार आणि बँकाची अनुक्रमे 4 लाख 39 हजार 332 आणि 1 कोटी 92 लाख 9 हजार 704 रुपयाची वसूली करण्यात आली असल्याची  माहिती देण्यात  आली.   
    न्या.तावडे म्हणाले की, या लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणातील पक्षकारांनी व त्यांच्या विधीज्ञानी प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्याचे आवाहन केले. 12 डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये कलम 256 आणि 258 फौजदारी प्रक्रीया संहीतानुसार जिल्हयातून 1 हजार 60 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून 13 रोजीच्या अदालतीमध्ये जिल्हयातून प्राप्त 902 न्यायप्रविष्ठ आणि 395 वादपूर्व प्रकरणाचा निपटारा करण्यात आल्याची  माहितीही यावेळी देण्यात आली.
          पोलीस अधिक्षक श्री. त्रिमुखे यांनी लोक अदालत संकल्पनेबाबत विचार मांडले.
          प्रास्ताविक दिवाणी न्यायाधिश वरिष्ठस्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पी. बी. मोरे यांनी या लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आलेल्या प्रकरणाची व पॅनलची माहिती दिली. पक्षकारांनी आपले न्यायप्रविष्ठ असलेली प्रकरणे तडजोडीने मिटवून घेण्याचे आवाहन केले.                                
          कार्यक्‌रमाचे सूत्रसंचलन दिवाणी न्यायाधिश ओ. आर. देशमुख यांनी  केले तर आभार दिवाणी न्यायाधिश वाय. पी मनाठकर यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान पक्षकार/ विधिज्ञांना रुपामाता मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटीच्यावतीने अध्यक्ष व्ही. व्ही. गुंड, विधीज्ञ यांनी भोजन देवून मोलाचे सहकार्य केले.  
 
Top