उस्‍मानाबाद - पंजाब येथील मुक्‍तसर साहिब येथे पार पाडलेल्‍या दि. 5 डिसेंबर ते दि. 8 डिसेंबर या कालावधीत पहिली राष्‍ट्रीय स्‍टुडंट ऑलंपिक स्‍पर्धा पार पाडली.महाराष्‍ट्र संघाने एकुण 41 सुवर्ण पदक, 14 रौप्‍य पदक व 40 कास्‍य  पदकांची कमाई केली. विजेत्‍या स्‍पर्धकात  नळदुर्ग येथिल बालाघाट
पहिली राष्‍ट्रीय स्‍टुडंट ऑलंपिक  स्‍पर्धेत महाराष्‍ट्र संघाने उत्‍तम कामगिरी केली असुन स्‍पर्धेत महाराष्‍ट्राच्‍या हॉकी संघाने व   बॅडमिंटन संघाने  प्रथम क्रमांक (सुवर्ण पदक) मिळवुन महाराष्‍ट्राच्‍या खात्‍यात सुवर्ण पदकांची भर टाकली तर मैदानी कुस्‍तीमध्‍ये वेगवेगळया वजन गटात दोन सुवर्ण पदक, खो - खो संघाने सुवर्ण पदक पटकावले. बॉक्‍सींग संघाने आपला व्‍यक्‍तीक खेळ करत दोन (सुवर्ण पदक) व दोन रौप्‍य पदक व दोन कास्‍य पदक पटकावले ,कबड्डी मध्‍ये 22 वर्षाखालील मुलांनी रौप्‍य व 19 वर्षाखालील मुलानी कास्‍य व क्रिकेटमध्‍ये 19 वर्षाखालील मुलानी व 17 वर्षाखालील मुलानी कास्‍य पदक पटकावले. या स्‍पर्धकामध्‍ये नळदुर्ग येथील कला विज्ञान वाणिज्‍य महाविद्यालयाचे सुनिल जाधव, अमोल कांबळे, तात्‍याराव जाधव, अक्षय कांबळे, राहुल चव्‍हाण, अमर बनसोडे, यांच्‍यासह बारा विद्यार्थी सहभागी झाले होते.आमदार मधुकरराव चव्‍हाण,माजी आमदार सि.ना आलुरे गुरूजी, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, प्राचार्य डॉ. सुहास पेशवे यांनी विद्यार्थ्‍यांना शुभेच्‍छा देवून अभिनंदन केले.
   महाराष्‍ट्र संघाचे प्रशिक्षक जावेद शेख यांचे मार्गदर्शन लाभले तर विद्यार्थ्‍यांचा उत्‍साह वाढविण्‍यासाठी महाराष्‍ट्राचे स्‍टुडंट ऑलंपिक महाराष्‍ट्र संघाचे अध्‍यक्ष सुनिल शिंदे , सचिव रफीक शेख यांनी विद्यार्थ्‍यांचे अभिनंदन केले. तर  खेळाडूंना शामलताई वडणे, शिला उंबरे, व्‍यंकटराव पोतदार, (स्‍टुडंट ऑलंपिक असोशिएशन महाराष्‍ट्र) सहसचिव, महाराष्‍ट्र क्रिकेट प्रशिक्षक शेख शकीब यांनी खेळाडूंना पुष्‍पगुच्‍छ देवून सत्‍कार केला. यशस्‍वी विद्यार्थ्‍यांची एशियन गेम्‍ससाठी निवड झाल्‍याबद्दल अभिनंदन केले जात आहे.
महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांचा समावेश आहे.
 
Top