उस्मानाबाद -  उस्मानाबाद तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांना सूचित करण्यात येते की, संस्थेची http://mahasahakar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अकौऊंट तयार करुन संस्थेची माहिती विहीत मुदतीत सादर करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सहकार  संस्था अधिनियम 1960 चे कलम 79 अन्वये 1 ते 6 विवरणपत्र अनिवार्य परतावे सन 2012-2013 व सन 2013-2014 या आर्थीक वर्षाचे तीन दिवसाचे आत भरणा करुन भरणा केल्याबाबतचा अहवाल या कार्यालयास सादर करावे, असे आवाहन सहायक निबंधक, सहकारी  संस्था, उस्मानाबाद यांनी केले आहे.
             ज्या सहकारी संस्था वरील सर्व विवरणपत्र सहकार विभागाच्या संकेतस्थळावर इलेक्ट्रॉनिक स्वरुपात विहीत नमुन्यामध्ये व विहीत मुदतीत अपलोड करणार नाहीत, अशा सहकारी संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 (सीए)  146 (जी ) , 147 (जी ) अन्वये कारवाईस पात्र ठरतील अथवा अशा सहकारी संस्था बंद असल्याचे गृहीत धरुन सदर संस्‍थेविरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960 चे कलम 102 अन्वये अवसायानाची कारवाई करणे भाग पडले.
           तसेच कलम 79 नुसार विवरणपत्र दाखल न करणे अथवा चुकीचे विवरणपत्र दाखल करणे हा कलम 146 जी नुसार गुन्हा ठरविण्यात आलेला असून कलम 147 जी नुसार नुसार हया गुन्ह्यासाठी रुपये 5 हजार रुपयापर्यंत दंडाची शिक्षेची तरतुद आहेत. याची संबंधित संस्थेनी नोंद घेवून आपली माहिती मुदतीत तात्काळ सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Top