बार्शी -  बँकेत रक्कम भरावयास गेलेल्या व्यापार्‍याचा पाठलाग करुन पैशाची पिशवी घेऊन पळून जाणार्‍या चोरट्यास नागरिकांनी महत्‌प्रयासाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले, परंतु पोलिसांकडून सदरच्या चोरट्यास सोडून देण्यात आले आहे.   
    गुरुवारी सकाळी दहाच्या दरम्यान सदरची घटना घडली. येथील व्यापारी मुलगे यांचा मुलगा बँकेत भरावयास नेत असलेल्या पैशावर चोरट्याने पाळत ठेवली. संधी शोधून पैशाची पिशवी हिसकावून पळून जाण्यात त्याला यशही मिळाले परंतु सदरच्या प्रकारानंतर मुलगे यांनी आरडाओरड करत चोरट्याचा पाठलाग सुरु केला. ऐनापूर मारुती रस्त्यावरील व्यापारी बँकेजवळ चोरट्याला पकडण्यास नागरिकांना यश मिळाले. सदरच्या घटनेनंतर रस्त्यावरील गर्दित काहीजणांनी त्याच्यावर हात उचलण्यास सुरुवात केली. कोणी कायदा हातात घेऊ नये यासाठी पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी काही वेळातच ऐनापूर मारुती रोडवरील पकडून ठेवलेल्या चोरट्याला पोलिस ठाण्यात नेले. सदरच्या प्रकारानं
तर मोठी रक्कम वाचविण्यात यश मिळालेल्या मुलगे यांनी या घटनेची रितसर तक्रार घटना पोलिस दफ्तरी लेखी देण्याची गरज होती परंतु पोलिस ठाण्याचा रस्ता नको म्हणून त्यांनी सदरची तक्रार देण्याचे टाळले. पोलिसांनी सदरच्या चोरट्याविरोधात लेखी तक्रार न आल्याने चौकशी करुन सोडून दिले. बार्शी शहरात यापूर्वी पोलिस असल्याची बतावणी करुन फसवणूक, महिलांचे सोन्याचे दागीने पळविणे, घाण टाकून तसेच इतर प्रकारे पैशाच्या बॅगा, पिशव्या आदी पळवून नेणे इत्यादी अनेक घटना वेळोवेळी घडल्या आहेत. सदरच्या घटनेत पोलिसांना कसलाही तपास करण्याची गरज लागली नाही नागरिकांनीच रंगेहाथ चोरट्याला पकडून ताब्यात दिले आहे. सदरच्या प्रकारातील आरोपी हा इतर कोणत्या गुन्ह्याशी संबंधीत आहे का हे तपासणे गरजेचे आहे.
 
Top