बार्शी -   लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या वतीने दि ते १२ जानेवारी या कालावधीत श्री भगवंत मैदानावर नवव्या राज्यस्तरीय कृषि व व्यापार प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष प्रकाश गुरडे यांनी दिली. या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी उद्योजक व कंपन्यानी नोंदणी करावी असे आवाहन संघटनेने केले आहे.
      मागील पंधरा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या सर्व समाजघटकासाठी कार्य करण्याच्या भूमिकेमुळे लायन्स क्लबचे नाव झाले आहे. दर दोन वर्षानी भरविण्यात येणारे कृषि प्रदर्शन बार्शीकरांना नवनवीन उपक्रमांची माहिती देते. श्री भगवंत मैदान येथे सुमारे १ लाख २० हजार चौरसगट जागेत हे प्रदर्शन भरविले जाणार आहे.
     या प्रदर्शनात शेती,शेतीपुरक व्यवसाय, स्थापत्य शास्त्र, आधनिक खेळणी व मनोरंजन, व्यापार, ऑनिक्स, संगणक, अशा विविध क्षेत्रातील विविध नवनविन तंत्रज्ञानाच्या माहिती व उपकरणे उपलब्ध करण्यात येतात. प्रदर्शन परिसरात चटई,चोवीस तास सुरक्षा व्यवस्था, विजपुरवठा, हवेशीर गाळे, निवास व भोजनाची व्यवस्था, अर्धगोलाकार आकाराचे बंदिस्त तयार गाळे,सी सी टिव्ही कॅमेराची सुरक्षा यंत्रणा आदी सुविधा उपलब्ध केल्या आहेत. मागील वर्षीच्या प्रदर्शनास सुमारे साठ हजारापेक्षा अधिक नागरीकांनी भेट दिली होती. अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रमुख संजय खांडवीकर मो.९४२२४५७२२७,९४२३५८७४०० यांचेशी संपर्क साधावा.
 
Top