बार्शी(मल्लिकार्जुन धारूरकर)  बांधावरील जनावरांच्या कारणावरुन केलेल्या मारहाणीत वसुदेव कृष्णा यादव यांनी वैराग पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवर आरोपी राजराम यादव व कमलबाई बाबासाहेब यादव रा.नांदणी यांना न्यायाधीश बी.टी.झिरपे यांच्या न्यायालयाने सहा महिन्यांची सश्रम कारावास व प्रत्येकी १ हजारंच्या दंडाची शिक्षा सुनावली. सदरचा गुन्हा २९ मार्च २००२ साली शेतामध्ये घडला होता. यातील जखमी वसुदेव यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण व कुर्‍हाडीच्या तुंब्याने मारहाण करण्यात आल्याची फिर्याद वैराग पोलिसांत दाखल करण्यात आली होती. सरकारतर्फे ७ साक्षीदारांच्या साक्षी तपासण्यात आल्या. जखमीची साक्ष ग्राह्य धरुन आरोप सिध्द करण्यात आले आहेत. सरकार पक्षातर्फे अॅड प्रसाद कुलकर्णी यांनी काम पाहिले.
 
Top