बार्शी -  शासनाने ठरविलेल्या धोरणा पेक्षा साखर कारखानदारांनी कमी दराची पहिली उचल दिली तसेच १४ दिवसांत शेतकर्‍यांची देय रक्कम अदा न करणारे कारखाने तात्काळ बंद करुन दोषींवर गुन्हे दाखल करावे आदी प्रश्‍नांकडे गांभीर्याने न पाहील्या शेतकर्‍यांवर कायदा हातात घेण्याची वेळ येईल असे निवेदन रघुनाथ दादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांनी दिले आहे.
            सदरच्या निवेदनात २०१४-१५ च्या खरीप पिके (कांदा, सोयाबीन, मुग, उडीद) वाया गेल्याने पिक विम्याची भरपाई मिळावी, कृषि कार्यालयामार्फत राबविलेल्या योजनांची
ग्रामसभेत चौकशी करुन कृषि अधिकार्‍यांनी केलेल्या भ्रष्टाचाराबाबत गुन्हे दाखल करावेत. कांदा उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांचे मागील दोन वर्षांपासून रक्कम न देणार्‍या व्यापार्‍यांवर कारवाई करावी. जिल्ह्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांतील काही व्यापारी शेतकर्‍यांची विविध प्रकारची फसवणूक करीत आहेत परंतु त्यांच्यावर कमिट्यांचा कसलाही अंकुश नसल्याने सर्व बाजार समित्या शासनाने ताब्यात घ्याव्या. विविध मागण्यांसाठी यापूर्वीही शेतकर्‍यांनी आदोलने केली आहेत परंतु प्रशासनाने कारवाई न केल्याने तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर चप्पलचा वापर करण्याचा प्रसंग ओढवला होता, अशा टोकाच्या भूमिका शेतकरी घेतील, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होईल असे मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसिलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी, मार्केट कमिटी व पोलिस ठाणे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 
Top