उस्मानाबाद - समाजातील निराधार, निराश्रीत, महिला, अत्याचार, पिडीत महिलांसाठी कार्य करणाऱ्या महिला तसेच स्वयंसहायता गट, कृषी आणि ग्रामीण रोजगार, पर्यावरण संरक्षण, महिला सशक्तीकरण, महिलांचे आरोग्य, कला व सांस्कृतीक कार्य, चेतना विकास आदि क्षेत्रात उत्कृष्ट मौलीक कार्य केलेल्या महिलांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय स्तरावर स्त्रिशक्ती 3 लाख रुपयांचा रोख पुरस्कार देण्यात येणार आहे, इच्छुकांनी आपले प्रस्ताव 22 डिसेंबरपर्यत जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी, उस्मानाबाद यांच्याकडे पाठवावेत.
    पुरस्कारासाठी उल्लेखनीय कार्य केल्याबदल 7 वर्षाचा अनुभव गृहीत धरण्यात येणार असून पुरस्कारासोबतच, प्रशस्तीपत्र व सन्माचिंन्ह देण्यात येणार  आहे, पात्रताधारक महिलांनी त्यांचे अलिकडील पासर्पोर्ट आकाराचे फोटो, आवश्यक कागदपत्राच्या 4 प्रतीसह प्रस्ताव जिल्हा माहिला व बाल विकास अधिकारी, गाळा क्रमांक 15,प्रशासकीय इमारत, उस्मानाबाद यांचेकडे पाठवावेत,असेही कळविण्यात आले आहे.      
 
Top