उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य  माध्यमिक व उच्च माध्यमिक ‍शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत माहे फेब्रु./ मार्च मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी खाजगी विदयार्थ्यांसाठी थेट अर्ज योजनेअंतर्गत  व उच्च माध्यमिक  प्रमाणपत्र इयता 12 वी परीक्षेला खाजगी विदयार्थ्यांसाठी फॉर्म नंबर 17 अतिविलंब शुल्कासह नाव नोंदणी  करण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत  वाढविण्यात आली आहे. 
        सर्व शाळा/ कनिष्ठ महाविदयालयांनी याची नोंद घ्यावी.  अधिक     माहितीसाठी  संबधित विभागीय मंडळ कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन राज्य मंडळ, पुणे सचिवांनी  केले आहे.                           
 
Top