उस्मानाबाद -  महिला प्रशिक्षणार्थीनी प्रशिक्षणानंतर हस्तकौशल्यातून स्वयंरोजगार करणे गरजेचे आहे, कला आत्मसात केली तरच हा व्यवसाय भरभराटीला येण्यास वेळ लागणार नाही, असे प्रतिपादन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे श्रीपतराव राठोड यांनी केले. उस्मानाबाद येथे आयोजित स्टेट बँक ग्रामीण  स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्‍था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबाद यांच्या संयुक्त विदयमाने  ग्रामीण भागातील दारिद्रय रेषेखालील महिला महिलांसाठी मल्टीफोन सर्विसिंग प्रशिक्षणाचा समारोप श्री.राठोड यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
    यावेळी स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक  व कर्मचारी आणि प्रशिक्षक श्री. राऊत, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी बी. आर. दुपारगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संचालक आर. य. चुंबळे म्हणाले की, संस्था स्थापनेपासून आजतागायत 46 प्रशिक्षणाव्दारे 1 हजार 280 पुरुष व महिला उमदेवारांना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी 503 प्रशिक्षणाथ्यांनी स्वयंरोजगार सुरु केला असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रशिक्षणार्थी संग्राम जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन अविनाश जाधव यांनी मानले.
 
Top