उस्मानाबाद - जिल्हाधिकारी डॉ.  प्रशांत नारनवरे   यांनी मुस्लीम समाजाच्यावतीने ईद-ए-मिलाद हा सण साजरा होत असल्याने  रविवार, दि. 4 जानेवारी रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबाद, नळदुर्ग, परंडा व कळंब शहरातील  सर्व प्रकारच्या दारु विक्रीची दुकाने सायंकाळी 6 वाजेपर्यंत  बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. 
          या आदेशानूसार सर्व बिअबार, परमीटरुम, देशी-विदेशी मद्य विक्रीची दुकाने, ताडी विक्री आदि अबकारी अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे व विक्री ठेवण्याचे आदेश दिले आहेत.         उर्वरीत ठिकाणी अनुज्ञप्तीचे व्यवसाय चालू राहतील, याची संबधितानी नोंद घ्यावी, असे जिल्हाधिकारी, उस्मानबाद यांनी कळविले आहे. 
 
Top