पांगरी (गणेश गोडसे) जेव्हा स्त्रियांना शिक्षण वर्ज्य होते,त्यांना शिक्षणापासून कोसो दूर ठेऊन त्यांच्यावर अन्याय ,अत्याचार होत होते तेव्हा ज्यांनी कोणताही विचार न करता स्त्रीशिक्षणाचे व्रत हाती घेतले त्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिन बालिका दिन म्हणून साजरा केला जातो.स्त्री शिक्षणाच्या खर्‍या जन्मदात्या,आधुनिक जगाच्या पहिल्या महिला शिल्पकार,दिन दलित,विधवा ,निराधार बालके यांच्या  माता आदि विविध विभूषणांनी सन्मानित करण्यात आलेल्या सावित्रीबाईच्या जन्मदिनी आजच्या आधुनिक युगातील बालिका व त्यांच्या समस्या याचा विचार होणे काळाची गरज आहे.
जेव्हा शिक्षणाची मक्तेदारी ही विशिष्ट समाजापुरतीच मर्यादित होती तेव्हा स्त्री शिक्षण हे "अनैतिक" अश्या स्वरूपाचे मानले जात असे.मात्र सावित्रीबाई फुले यांनी काळाची पावले ओळखून स्त्री शिक्षणाचा फक्त प्रसार न करता स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा प्रयत्न करून पुढील अनेक शतकासाठी पुरेशा होईल येवढा विचारधनाचा साठाही देऊ केला होता.दिडशे वर्षापूर्वी 'चूल नि मूल'येवाध्यावरच न थांबता घराबाहेर पडून निकराने सामाजिक संघर्ष करा हा दिलेला संदेश आज अमलात आला आहे.
    अनेक वर्षापासून सुरू असलेल्या मोहिमेला यश आलेय का याचा विचार करणे गरजेचे झाले आहे.आजची स्त्री शिकली,सुधारली,खूप पुढे गेली मात्र कांही चांगला पुरातन ठेवा मात्र त्यांच्याकडून खूप खूप मागेच विसरून गेला असल्याची खंत आज समाजातील ज्येष्ठाना सतावू लागली आहे.आजच्या बालिका दिनी समाजाच्या विविध स्तरात कार्यरत असणार्‍या स्त्रिया,पुढारपान करणार्‍या स्त्रिया,व्यवसाय,नौकरी यात गुंतलेल्या स्त्रिया यांनी विचार करून समाजातील मागास राहिलेया आपल्या भगिनीच्या विकासासाठी कांही पावले उचलणे स्त्री हितावह ठरणार आहे.जेव्हा स्त्री स्त्रीच्या विकासासाठी कंबर कसून मनातून विकासासाठी प्रयत्न करेल तेव्हाच खर्‍या अर्थाने स्त्री विकास साध्य आहे.
  आज समाजातील बालिकावर होणारे अन्याय,अत्याचार,खून याचा विचार होणे काळाची गरज होत आहे.मात्र बालिकांच्या प्रश्नावर कायदे करून नामानिराळे होण्यापेक्षा कोणी काही वेगळे करत नाही.होणारा अन्याय समाज उघड्या डोळ्यांनी पाहण्यात धन्यता मानत आहे.
 अन्यायाची सुरुवात घरातूनच: बालिकावर अन्याय होण्याची सुरुवात ही घरातूनच होत असल्याचा निष्कर्ष तज्ञाणी काढलेला आहे.नातेवाईक,घरातील मानसाकडून बालिकावर अन्यायाची सुरुवात होते.आपल्याच मानसाकडून त्रास होत असल्यामुळे दाद मागायची कोणाकडे,आपल्याच माणसाविरुद्ध जायचे का? यामुळे घरातील अन्याय हा घरातच दाबला जातो॰
 या घटकावर होणारे अत्याचार थांबने काळाची गरज असली तरी त्याची सुरुवात होणे गरजेचे आहे.समाजात आज अनेक संघटना कार्यरत असल्या तरी किती संघटना ह्या प्रामाणिक काम करून न्यायासाठी झगडतात हा संशोधनाचा विषय होऊ शकतो
 
Top