कळंब -: पत्रकारीतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या पत्रकारांना कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने मागील 16 वर्षापासून पुरस्काराने सन्मानित करण्यात येते आहे. त्यामुळे जिल्ह्यात हे पुरस्कार मानाचे समजले जातात. सन 2012-13 च्‍या उत्‍कृष्‍ट पत्रकारिता पुरस्‍काराचे वितरण सोमवार दि. 5 जानेवारी रोजी होणार आहे.
सन 2012-13 या वर्षीचे कै. शिवशंकर (आप्पा) घोंगडे जिल्हस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार विशाल सोनटक्के (जिल्हाप्रतिनिधी दैनिक लोकमत, उस्मानाबाद), साप्ताहीक पावनज्योतचे संपादक कै. शि.म. ज्ञानदेव मोहेकर गुरुजी, राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार रणजित खंदारे (वृत्तसंपादक दैनिक सकाळ), विधायक वृत्त वाहीनी पुरस्कार संतोष जाधव (जिल्हाप्रतिनिधी टिव्ही 9 ,उस्मानाबाद ) यांना देण्‍यात येणार आहे. तसेच कै. रा. ई काकडे उत्कृष्ट पत्रकारीता पुरस्कार श्रीकृष्ण कोल्हे (दैनिक लोकसत्ता, पुणे) यांना तर कै. गणेश घोगरे पत्रकारीता पुरस्कार विकास गाढवे (दैनिक सकाळ, लातुर) यांना जाहीर करण्यात आला आहे. 
    सदरील पुरस्कार प्राप्त पत्रकारांना पुरस्‍कारचे वितरण राजेंद्र हुंजे (न्युज इडिटर आयबिएन लोकमत), यमाजी मालकर ( सल्लागार संपादक , दैनिक दिव्य मराठी ), रविंद्र तहकीक (कार्यकारी संपादक, दैनिक लोकपत्र), संतोष देशपांडे (संचालक मिडीयाक्युरा इन्फोलाईन पुणे), प्रा.अशोकराव मोहेकर (मोहकर महाविद्यालय ), नगराध्यक्ष सौ.मिराताई चोंदे यांच्या हस्ते दि. 5 जानेवारी 2015 रोजी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयील सभागृहात सकाळी 11 वाजता होणार आहे. तरी या पुरस्कार समारंभास सर्वांनी उपस्थित राहावे असे अवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले अहे. 
 
Top