उस्मानाबाद :- विधीज्ञानी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाज सेवेसाठी करावा. दुखात सापडलेल्या गरजुंचे अडी-अडचणी समजावून घेवून त्यांना न्यायदानाच्या माध्यमातून तात्काळ न्याय व मोबदला मिळवून देण्याच्या कामास प्राधान्य दयावे, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश  वरीष्टस्तरचे न्या. पी. बी. मोरे यांनी केले. उस्मानाबाद तालुक्यातील वाडी  (बामणी)  येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,उस्मानाबादच्यावतीने आयोजित जिल्हा विधी साक्षरात  शिबीरात बोलताना न्या. मोरे केले.
यावेळी सहदिवाणी  न्यायाधिश  (व. स्तर) वाय. पी. मनाठकर, बेंबळीचे पोलीस निरीक्षक  श्री. पाटील, विधीज्ञ वैशाली देशमुख, एम. बी. माढेकर, डी. एस. तपीसे, बी. वाय. बिडवे, लक्ष्मी पांचाळ, एस. एस. कुलकर्णी, श्री पवार, कु. प्रणिता मोकाशे, अनुराधा जोशी, आशा टेळे, विधीज्ञ कार्यक्रमास उपस्थीत होते.
         विधिज्ञ कु. मोकशी यांनी यांनी महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, अॅड.  कुलकर्णी यांनी महात्मा गांधी तंटामुक्‍त विविध योजनेची माहिती दिली. अनुराधा जोशी यांनी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनची माहिती दिली. आशा टेळे यांनी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी शेतकरी आत्महत्या केलेल्याना नुकसान भरपाईची माहिती देवून  शेतकऱ्यांना आत्महत्येपासून  परावृत्त करण्यासाकरीता विविध योजनेची साध्या व सोप्या भाषेत माहिती दिली.
प्रास्ताविक न्या.  मनाठकर यांनी केले. सूत्रसंचलन ॲड. माढेकर यांनी केले. आभार अॅड. बिडवे उपसरपंच वाडी (बामणी)  यांनी केले. या शिबीरास सुमारे 290 ग्रामस्थ, शेतकरी उपस्थित होते.                                    
 
Top