पांगरी (गणेश गोडसे) :- शालेय शिक्षण घेणार्‍या पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीस गावातीलच एका तरुणाने फूस लावून तिला पळवून नेल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता कारी (ता. बार्शी) येथे घडली आहे. त्यामुळे कारी येथील पालकामध्ये एकाच खळबळ उडाली असून त्यांच्यापुढे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
महेश दत्तू चव्हाण (वय 22,  रा.कारी) असे अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नांव आहे.
    पळवून नेण्यात आलेल्या मुलीच्या वडिलांनी पांगरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की त्यांची मुलगी गावातीलच हायस्कूलमध्ये इयत्ता नववीमध्‍ये शालेय शिक्षण घेत असून काल शाळा सुटल्यानंतर त्यांची मुलगी आंबेजवळगे रोडावरुन घराकडे येत असताना गावातीलच महेश चव्हाण याने त्यांच्या मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिला फूस लावून त्याच्या मोटारसायकलवरून पळवून नेले.मुलगी शाळेतून घराकडे परतली नाही त्यामुळे पालकांनी तिच्या शाळेत धाव घेऊन चौकशी केल्यानंतर व मुलगी शाळेतून गेल्याचे त्यांना समजले.नंतर माहिती घेतल्यानंतर मुलीस फूस लावून पळवून नेण्यात आल्याचे पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पांगरी पोलिसात धाव घेतली.मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश चव्हाण याच्याविरुद्ध अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पांगरी पोलिस करत आहेत.
 
Top