उस्‍मानाबाद -: पोलिस कल्याण केंद्र संचलित येथील लिटील स्टार शाळेत महाराष्ट्र पोलिस दिनानिमित्त इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्‍यांची उस्मानाबाद पोलिस या विषयावर चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. तसेच या सर्व मुलांना जिल्हा पोलिस प्रशासनाकडून राबविण्यात येणा-या सर्व उपाययोजनांची माहितीही देण्यात आली.
येथील लिटील स्टार शाळेच्या वतीने महाराष्ट्र पोलिस दिनानिमित्त उस्मानाबाद  पोलिस या विषयावर या विषयावर इयत्ता ५ ते ८ वीतील विद्याथ्र्यांची चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्याक डी. एम. भांगे यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यानंतर शाळेतील सर्व मुलांना जिल्हा पोलिस मुख्यालयात पाठवून समाजात कायदा व सुव्यस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून करण्यात येणाNया सर्व उपाययोजनांची तसेच साहित्याची माहिती देवून त्यांना प्रात्यशिकही दाखविण्यात आले.
रायफल्स कशा हाताळाव्यात, बिनतारी संदेश यंत्रणा कशी काम करते तसेच बॉम्ब शोधक पथकाचीही माहिती देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा पोलिस प्रमुख अभिषेक त्रिमुखे यांनी या सर्व मुलांना मार्गदर्शन करुन त्यांच्या प्रश्नाची उत्तरे दिली. त्यानंतर जिल्हा पोलिस प्रमुखांनी या सर्व विद्याथ्र्यांना पोलिस दिनानिमित्त तसेच नववर्षानिमित्त शुभेच्छाही दिल्या. महाराष्ट्र पोलिस दिनानिमित्त घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धा तसेच विद्याथ्र्यांची पोलिस मुख्यालयातील भेट यशस्वी करण्यासाठी श्रीमती आर. एस. शिवणीकर, श्रीमती एस. व्ही. पांचाळ, श्रीमती कांबळे ए. आर. श्रीमती रेगुडे एस. एस., श्रीमती पाटील आर. जी., शेटे एस. एम. आदिनी मोलाचे परिश्रम घेतले.
 
Top