बार्शी (मल्लिकार्जून धारूरकर)  प्रतिवर्षाप्रमाणे बार्शीतील पैगंबर जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महंमद पैगंबर यांच्या नामघोषात मु
Add caption
स्लिम बांधवांनी शहरातील प्रमुख मार्गावरुन शांततेचा संदेश देणारी फेरी काढली.
मदिना मस्जिद येथे मिरवणूकीची सांगता करतांना सलाम व फातेहाखानी करुन दुआ करण्यात आली. यावेळी देशात व जगात शांतता बंधुभाव रहावा, महंमद पैगंबर यांनी दिलेली वचने पाळावी अशी प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी सर्व मस्जिदमधील मौलानांचा सत्कार अध्यक्ष हाजी मुनीर शेख यांच्या हस्ते करण्यात आला. मदिना मस्जिद जुलूस कमिटीच्या वतीने या फेरीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ऍटो रिक्षा, कार, जीप, दुचाकी आदी विविध वाहनांची आकर्षक सजावट केलेली वाहने रॅलीत सहभागी करण्यात आले होते. या मिरवणूकीची सुरुवाती शाहिर अमर शेख चौक येथून करण्यात आली. मिरवणुकी दरम्यान अनेक सामाजिक संस्थांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला. कोशीश ग्रुपच्या सदस्यांनी मिरवणूकीतील मार्गावरुन जुलूसच्या पाठीमागून येत सर्व स्वच्छता मोहिम राबवून शहर स्वच्छतेचा संदेश दिला. या उपक्रमाबद्दल पोलिस निरीक्षक सालार चाऊस यांच्या वतीने कोशीश ग्रुपच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
जुलूस यशस्वी करण्यासाठी मदिना मस्जिद जुलूस कमिटीचे सर्व सदस्य, पदाधिकारी यांच्यासह आदमभाई तांबोळी, आयुबभाई शेख, अकिल जवळेकर, एल.बी.शेख, ऍड्.असिफभाई तांबोळी, जहरुद्दीन आतार, याकुब शेख, महंमद हनिफ चौधरी, पप्पूभाई पठाण, शकिल शेख, शकिल झारेकरी, अब्दुल रहेमान पापडीवाले, ख्वॉजाभाई दावती, ग्रीनस्टार ग्रुपचे सलीम शेख, दावते इस्लामी तहरिक यांनी प्रयत्न केले.
यात के.एम.सी.ग्रुप, हुसैन शेख परिवार, सहारा ग्रुप, सुफी ग्रुप, कदिरभाई बागवान परिवार, महाराष्ट्र इंजिनिअरींग, गणेश पान, झेंडेवाली सवारी ग्रुप, मौला मुलाणी मित्र परिवार, दाणे गल्ली यंग पार्टी, अर्शे आझम ग्रुप, आझाद बहुउद्देशीय संस्था, गुजरात साडी, अहेमद रजा ग्रुप, देशमुख प्लॉट यंग पार्टी, ताज ग्रुप, इकबाल पटेल मित्र मंडळ, मलिक यंग पार्टी, जिगर ग्रुप, लिंबूवाली सवारी, महेदी नगर सुलताने यंग पार्टी, महेदिया यंगा ग्रुप, मुबारक मणियार तपकिरवाले, असिफ नसीर जिकरे, महेबुब सुबहाणी ग्रुप, लब्बेय्या ग्रुप आदी सामाजिक संघटना व मित्र परिवारांच्या वतीने सहभागी समाजबांधवाना मिठाई, पाणी आदींचे वितरण केले.
मिरवणूकीवेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, रणजित कोंढारे, दिपक राऊत यांच्यासह विविध पदाधिकारी यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. संपूर्ण जुलूस यशस्वी व शांततेने पार पाडल्यानंतर जुलूस कमिटीच्या वतीने पोलिस निरीक्षक सालार चाऊस, वटारे मॅडम यांचा सत्कार करण्यात आला.

 
Top