उस्मानाबाद -  माजी सैनिक/विधवा यांचे जमीन, महसूल व  घरमालकीच्या  अशा एकूण 13 तक्रारीचे अर्ज सैनिक दरबार व लोकशाही दिनात प्राप्त झाल्या. या तक्रारींचे समन्वयाने निराकरण  करुन तक्रारी अर्ज तातडीने निकाली काढण्याचे निर्देश संबंधित विभागांना जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकशाही दिन सैनिक दरबार यांचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी वरील निर्देश दिले.  
याप्रसंगी अपर पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी (नि) सुभाष सासने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी  प्रभोदय मुळे, उप जिल्हाधिकारी (पुनर्वसन) अरविंद लाटकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. 
जिल्हाधिकारी डॉ. नारनवरे म्हणाले की, माजी सैनिक/ विधवा यांच्या समस्या सोडविण्यासाठी  जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पोलीस प्रशासन आणि तहसील कार्यालयाने महिन्यातून एकदा तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने 2 महिन्यातून एकदा सैनिक दरबाराचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. 
या बैठकीत संबंधितांनी दिलेल्या अर्जादारांचे  सर्व अर्जदारांचे संयुक्त म्हणणे ऐकूण घेण्यात आले. अर्जादारांनी केलेल्या तक्रारी व त्याच्या अर्जावरील कार्यवाहीसाठी सकारात्मक विचार करुन प्रकरण तात्काळ निकाली काढण्याबाबत संबंधितांना आदेशित केले. 

 
Top