उस्मानाबाद -  विभागीय महसूल आयुक्त कार्यालय, औरंगाबादचे विभाग करण्यासाठी शासन अधिसूचना 16 फेब्रुवारी,2015 रोजीच्या राजपत्रात प्रसिध्द करण्यात आली आहे. औरंगाबाद महसूल विभागाचे विभाजन करुन नांदेड येथे मुख्यालय असलेले नवीन विभाग महसूल विभाग स्थापन करण्यासंबंधी प्रारुप अधिसूचना त्यास अनुसरुन परिणाम होण्याचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरता प्रसिध्द करण्यात येऊन त्याद्वारे         दि.2 फेब्रुवारी,2015 पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या ऐवजी सदर दि.16 मार्च,2015 नोंदविता येतील,असे उपआयुक्त (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद यांनी कळविलेल्या पत्रात नमूद केले आहे.
 
Top