उस्मानाबाद -  महिला प्रधान एजंटामार्फत 5 वर्षाच्या आर. डी. खात्यात दरमहा नियमितपणे रक्कम  जमा केल्यानंतर अल्पबचत एजंटाकडून पावती घेतल्याशिवाय रक्कम गुंतवणूकीसाठी देवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे अल्पबचत व राज्य लॉटरीचे आयुक्त यांनी केले आहे. 
कांही एजंट गुंतवणूकदाराचे विश्वास संपादन करुन दरमहा रक्कम जमा करुन ती रक्कम पोस्टात न भरता खाजगी कामासाठी वापर करुन रक्कमेचा अफरातफर करत असल्याचे निदर्शनास आले आले. यापुढे गुंतवणूकदारांनी  एजंटाकडे रक्कम जमा केल्यानंतर लगेच  पोच पावती घेवून आपली रक्कम सुरक्षित राहील याची सर्वांनी  दक्षता घ्यावी. 
तसेच गुंतवणूकदारांनी  महिला प्रधान एजंट पोस्टात जमा करते किंवा नाही याची नियमितपणे पासबुक पाहून किंवा पोस्टात जावून चौकशी करुन खात्री करावी. आपल्या रक्मेचा गैरव्यवहार होणार नाही याचीही  खातेदारांनी काळजी घेणेआवश्यक आहे. दरमहा खाते पुस्तक पाहिल्यावर या अफरातफरीस  वाव राहणार नाही. खातेदारांकडे असणाऱ्या ॲसलास-5 कार्डावर  पासबुक पहाणे गरजेचे आहे.
अल्पबचत एजंटाचे गुंतवणूकदारांकडून पैसे स्वीकारताना पावती देणे आवश्यक असल्याने तो गुंतवणूकदारांकडे तो रक्कम पैसे दिल्याचा पुरावा असतो. त्यामुळे गुंतवणूदारांची गुंतवणूक सुरक्षित राहण्यास मदत होते.अल्पबचतीबाबत  कांही तक्रारी असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील , (अल्पबचत) शाखेशी  संपर्क साधण्याचे आवाहन आयुक्त अल्पबचत व राज्य लॉटरी महाराष्ट्र राज्य यानी यांनी केले आहे.     

 
Top