बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर) प्रत्येक स्त्री ही कोणाचीतरी आई, आजी, पत्नी, मुलगी, नात यासारख्या विविध नात्यांद्वारे प्रत्येक पुरुषांना आधार देण्याचे काम करत आपले कर्तव्य पार पाडते त्यामुळे आपण स्त्री असल्याबद्दल अभिमाना बाळगावा असे प्रतिपादन सौ.शोभा लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी केले.
 
  जागतिक महिला दिनानिमित्त सहयोग स्थानिक रहिवाशी मंडळाच्या वतीने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.सौ. स्मिता यादव, डॉ.सौ. कविता जगताप, सौ. कल्पना देवकर, सौ. चंद्रभागा घळके, सौ. रेश्मा बोधले, सौ. जयश्री माळ्वद्कर, डॉ. सौ.मीरा यादव, सौ. अनीता कुलकर्णी, सौ.संगीता उबाळे, सौ. जयश्री गांधी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. बोल्ली म्हणाल्या, पुरुषाच्या आयुष्यातून स्त्री वगळून पाहिल्यास तिचे महत्व आणखी प्रकर्षाने कळेल, परंतु स्त्रीयांनीही आपली भूमिका निष्ठेने पार पाडायला हवी. सहयोग मंडळातील सर्व स्त्रियांनी दुपारी एकत्रपणे विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम घेतला. सायंकाळी मंडळाच्या खुल्या जागेत पाककला व शाकाहारी पदार्थांच्या आकर्षक सजावटीट्या स्पर्धा घेण्यात आल्या यात सुमारे ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सौ. दीपा देशमुख आणि सौ. पल्लवी सोनिग्रा यांनी काम पाहिले. पाककलामध्ये सौ. प्रतिमा जाधव, सौ.अंजली गव्हाणे व सौ. अर्चना तिकटे तर शाकाहारी पदार्थांच्या आकर्षक सजावटीमध्ये सौ. वर्षा घावटे, सौ.ज्योति करंजकर व सौ.अंजली गव्हाणे यांना अनुक्रमे पहिला, दूसरा व तिसर्‍या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

 
Top