उस्मानाबाद - स्टेट बँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उस्मानाबादच्यावतीने ब्युटी र्पालर मॅनेजमेंट प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोप श्री. इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी सहायक प्रकल्प संचालक श्री. राठोड, रवीकिरण कदम, स्टेट बँक  ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे  प्रशिक्षक माया घाटेराव उपस्थित होते. 
अध्यक्षीय भाषणात श्री. इंगोले यांनी प्रशिक्षणानंतर प्रशिणार्थ्यांनी बी. पी. एल. न  राहता ए. पी. एल. कसे व्हावे यासाठी प्रशिक्षणार्थ्यांनी कष्‍ट करण्याची मनापासून तयारी ठेवण्याची गरज प्रतिपादन केली. श्री.राठोड यांनी प्रशिक्षणार्थ्यास प्रामाणिक काम कसे महत्वाचे असते याविषयी माहिती दिली तर श्री. गायकवाड यांनी बँकेत जाण्याअगोदर काय तयारी केली पाहिजे या विषयी सखोल माहिती दिली.
प्रास्ताविक विकास गोफणे यांनी प्रशिक्षण आयोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर एल.एम. व्ही. ड्रायव्हींग  प्रशिक्षण वर्ग 30 मार्चपर्यंत असून त्यासाठी दारीद्रयरेषेखालील 18 ते 35 वयोगटातील पुरुषांनी प्रवेशासाठी 7875443799 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रशिक्षणार्थी पौर्णिमा करडे  व सुप्रिया रोडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गोकर्णा माळी यांनी केले.

 
Top