उस्मानाबाद--सैन्य दलात तसेच पोलीस दलात भरती होवू इच्छिणा-या सर्व नव युवक-युवतींना सूचित करण्यात येते की, सैन्य व पोलीस दलात भरतीसाठी मार्गदर्शन शिबीरात निवड करण्यासाठी मेस्को कॅरीअर आकेडमीचे प्रतिनिधी सैनिकी (मुलांचे) वसतीगृह, खाजानगर, धाराशिव मंदीरासमोर, उस्मानाबाद येथे येत्या 24 मार्च रोजी सकाळी 9 वाजता  येणार आहेत.
इच्छुक युवकांसाठी  आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रकासह उस्मानाबाद येथे हजर राहून या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी उमेदवारांने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत मो. क्रमांक-7588624043 किंवा 9420697807 संपर्क साधावा व महाराष्ट्र माजी  सैनिक महामंडळ मेस्काच्या खालील संकेतस्थळास भेट दयावी, असे आवाहन करण्यात आले आहे. www.mescoltd.co.in मेस्को कॅरिअर ॲकॅडमी, करंजे नाका, सातारा येथे माफक दरात दर्जेदार सैन्य व पोलीस दल भरतीपूर्व प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.   हे प्रशिक्षण शिबीर 2 एप्रिल ते 31 मे,2015 या कालावधीत  घेण्यात येणार आहे. यात राहण्याची, जेवणाची तसेच मैदानी व लेखी परीक्षेची तयारी करुन घेण्यात येणार आहे. 

 
Top