नळदुर्ग -  पाटील तांडा (खुदावाडी)  ता. तुळजापूर येथिल जि. प . प्राथमिक शाळेत शुक्रवार रोजी सांयकाळी सात वाजता ' बाल उत्‍सव '  आयोजित करण्‍यात आले आहे. यावेळी विविध गुणदर्शन व सांस्‍कृतीक कार्यक्रम होणार आहे. 
या कार्यक्रमाचे उदघाटन तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे व्‍हा. चेअरमन सुनिलराव चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जि. प. अध्‍यक्ष धिरज पाटील हे असुन प्रमुख पाहुणे म्‍हणुन तुळजापुर कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे सभापती  सचिन पाटील, संचालक हरिष जाधव, पंचायत समितीचे उपसभापती प्रकाश चव्‍हाण, जि.प.सदस्‍या सौ. छाया सोमवंशी.गट विकास अधिकारी विलास खिल्‍लारे, गट शिक्षण अधिकारी कल्‍याण सोनवणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.वाय.डांगे, सरपंच रेवण्‍प्‍पा स्‍वामी, उपसरपंच शिवाप्‍पा जवळगे. शिक्षण विस्‍तार अधिकारी जोशी के.ए., केंद्र प्रमुख सालेगावे डि.के.,  कांत राठोड , अविनाश मोकाशे, पृथ्‍वीराज मुळे आदिची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

 
Top