पांगरी (गणेश गोडसे) :- निसर्गाने शेतकर्‍याची अनेक वर्षापासून सुरू केलेली क्रूर चेस्टा, दुष्‍काळी परिस्थिती, नुकतीच अवकाळी पावसाने घातलेला धुमाकूळ व एका  सामाजिक संघटनेने सुरू केलेले जनप्रबोधन यामुळे पांगरी (ता.बार्शी) सह परिसरात अनेकांनी गुढी पाढवा हा सणच साजरा केला नाही तर काहीनी गुढी पाढवा अतिशय साध्या पद्धतीने साजरा केला. दुष्काळाच्या छायेसह बाजारपेठेतील मंदिही गुढी पाढवा साध्या रितीने होण्यास कारणीभूत ठरली आहे. काहींनी सकाळी लवकर उठून गुढी उभारून विधिवत पूजा करून गुढी उभी करून संस्कृती, परंपरा, चालीरीती, श्रद्धा जोपासण्याचा प्रयत्न आजही सुरू ठेवला आहे.
गुढी पाढवा म्हणजे नेमकं काय याबाबत समाजात वेगवेगळे मत प्रवाह वाढत असल्यामुळे तसेच काही संघटना गुढी पाढव्यादिवशी  बहुजनाचा राजा संभाजी महाराज यांच्या वधाचा दिवस असल्यामुळे प्रखर विरोध करताना दिसत आहेत. या संघटनांनी अनेक दिवसापासून मोहीम राबवून समाजप्रबोधन करत गुढी पाढ्व्यास प्रखर विरोध दर्शवत आहेत. गुढी पाढव्यामागचा नेमका उद्देश काय,हा सन कोणी व केव्हापासून सुरू केला, हा सण सुरू करण्यामागे त्याचा हेतु काय होता आदि विषयावर सध्या समाजात मोठ्याप्रमाणात विचारमंथण सुरू आहे. याचा मोठा परिणाम बहुजन समाजात यावर्षी जाणवत होता. बहुजन समाजातील अनेकांना मूळ इतिहास समोर आल्यामुळे अनेकांनी गुढी पाढवा हा सण साजरा न करण्याचे धारिष्ट दाखवण्यास सुरुवात केली आहे.
प्रभू रामचंद्र रावणाचा वध करून या दिवशी अयोध्येत आल्यामुळे व पाढवा हे नूतन वर्ष असल्याचे पूर्वजाकडून सांगितले जात असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुढ्या उभारल्या जात असल्यामुळे नेमक काय हे मात्र गुलदस्त्यात आहे.

 
Top