उस्मानाबाद - जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी स्वयंरोजगार विषयक,व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशनाचे काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी आपले प्रस्ताव 11 मार्च,2015 पूर्वी सादर करण्याचे आवाहन सहायक संचालक, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद यांनी केले आहे.
  ज्या स्वयंसेवी संस्था व व्यक्ती काम करण्यास ईच्छूक असणाऱ्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.ईच्छूक संस्थांनी नमुना-1 मध्ये संस्थेचे नाव,संस्थेचा संपूर्ण पत्ता,ई-मेल पत्ता,दुरध्वनी/भ्रमणध्वनी व संपर्क व्यक्तीचे संपूर्ण नांव व दुरध्वनी /भ्रमणध्वनी क्रमांक  आदि तसेच व्यक्ती यांनी नमुना -2 मध्ये व्यक्तींचे नाव व संपूर्णपत्ता,व्यवसाय (करिअर काऊन्सलेर/मानसशास्त्रज्ञ/इत्यादी), शैक्षणिक पात्रता,अनुभव/वर्ष, संपर्क ईमेल व दुरध्वनी /भम्रणध्वनी क्रमांक इत्यादी सविस्तर माहितीसह प्रस्ताव जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र, उस्मानाबाद या कार्यालयाकडे अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक -02472-222236 व संपर्क साधावा. 
स्वयंसेवी संस्था व व्यक्तींची माहिती आणि प्रस्ताव संकलित करुन मा.उपसंचालक, रोजगार व स्वयंरोजगार, विभागीय मुख्यालय,औरंगाबाद यांचे मार्फत रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, नवी मुंबई यांना प्रस्ताव सादर करावयाचे आहेत. त्यामुळे वेळेत प्रस्ताव सादर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.  

 
Top