उस्मानाबाद -  ‍वार्षीक तपासणीच्या निमित्ताने  येथील जिल्हा कोषगार कार्यालयास  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज (31 रोजी) भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. यावेळी कोषागार अधिकारी श्री.कदम यांनी कोषागार कार्यालयाच्या कामकाजाची माहिती दिली. जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत चालू असलेल्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त असून कामकाज अधिक गतीने करण्यासाठी सविस्तर चर्चा करुन योग्य सूचना यावेळी त्यांनी दिल्या. ‍
      यावेळी त्यांच्यासमेवत अप्पर जिल्हाधिकारी जे.टी.पाटील, उप जिल्हानिवडणूक  अधिकारी प्रभोदय मुळे, कोषागार अधिकारी राहूल कदम, श्री.देगावकर यांच्यासह कार्यालयातील  अधिकारी व कर्मचारी यांची   उपसिथती होती. 
प्रारंभी  कोषागार  अधिकारी राहूल कदम यांनी सर्वांचे स्वागत करुन आभार व्यक्त केले. 

 
Top