बार्शी -  भारतीय कम्युनिस्ट पक्षासह विविध संघटनांच्या वतीने कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या अस्थिकलशाला अभिवादन करुन त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी बार्शी तहसिलवर मोर्चा काढून मारेकरी पकडण्यासाठी निवेदन देण्यात आले.
बार्शीतील लक्ष्मीतीर्थ उद्यानात वृक्षारोपन करुन भगवंत मैदान येथून तहसिलवर मोठ्या संख्येने हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी कॉ.तानाजी ठोंबरे म्हणाले, माजी पोलिस महानिरीक्षक एस.एम.मुश्रीफ यांच्या हु इज किल्ड करकरे या पुस्तकाच्या अनुषंगाने राज्यभर १५० व्याख्याने घेऊन २६/११ च्या हल्ल्यामागे असलेल्या हिंदुत्ववादी संघटनांचे पितळ उघडे करण्याचा मानस कॉ.पानसरेंचा होता त्यामुळे त्यादिशेने तपास करावा. सरकारला हा खून आम्ही पचवू देणार नाही. मारेकर्‍यांची मोटरसायकल सापडते, जखमी उमा पानसरेंचा जबाब नोंदविण्यात येतो, रेखाचित्र तयार आहे मग तपास का होत नाही याला शासन जबाबदार आहे.

 
Top