नळदुर्ग -  येथील श्री दत्‍त कला विकास नाटय मंडळाच्‍यावतीने येत्‍या 15 मार्चला 'मंगळसुत्र' हे कौटुंबिक नाटक नळदुर्गमध्‍ये सादर करण्‍यात येणार आहे. नळदुर्ग शहर व परिसरातील नाटय रसिकांनी या नाटकचा लाभ घेण्‍याचे अवाहन करण्‍यात आले आहे. 
    नळदुर्ग शहरातील नाटय कलावंतानी यापूर्वी अनेकवेळा नाटकांचे प्रयोग सादर  केले होते. त्‍यास नाटय रसिकांनी भरघोस प्रतिसाद दिल्‍याचे सर्वश्रुत आहे. नाटकचे व्‍यासपीठ गाजविणारी  काही मंडळी काळाच्‍या पडद्याआड गेल्‍याने शहरातील नाटयकला जवळपास संपुष्‍टात आली होती. मात्र नाटय कला जोपासणा-या शहरातील विनायक भूमकर, आनंदा पांचाळ, ज्‍योतिबा येडगे,  रमेश अंधारे, सौ. भारती अंधारे व त्‍यांच्‍या सहकार्यांनी नाटय कलाकारांना एकत्रीत करून नळदुर्ग शहरात पुन्‍हा नाटयकाचे प्रयोग सुरू केले आहे. 
  या कलाकारांनी यापूर्वी  'खरा वारसदार' वाहतो ही दुर्वाची जुडी, इच्‍छा माझी पुरी करा, हॅलो मी चेअरमन बोलतोय, हाच खेळ नशिबाचा, सौभाग्‍य नाही नशिबी, कन्‍या ही सासुरवासी जाय, यासह अनेक विविध  नाटकाचे  प्रयोग बहारदारपणे सादर केले आहेत.आजही या नाटकातील कलाकारांनी केलेल्‍या पात्र व कथा याबाबत रसिक वर्गातून चर्चा व कौतुक केले जाते.  'मंगळसुत्र' हे कौटुंबिक व सामाजिक नाटक रविवार दि. 15 मार्च रोजी शहरातील मध्‍यवर्ती ठिकाणी बसलेल्‍या लोकमान्‍य वाचनालयाच्‍या मैदानावर सादर होणार आहे. या नाटकात वरील कलाकारांसह उस्‍मानाबादच्‍या शितल साळुंके, केशेगाव येथील रमेश बिराजदार हे कलाकार या नाटकात सहभागी होणार आहेत. असे ज्‍योतिबा येडगे यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.  

 
Top