बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)  वंजारी सेवा संघ महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या बैठकीत बार्शीतील अभियंता संतोष जाधवर यांची निवड करण्यात आल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष राहुल जाधवर यांनी दिली.
रविवारी बार्शीतील शासकिय विश्रामगृहात संघटनेची बैठक बोलावण्यात आली होती यावेळी ही घोषणा करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे पंचायत समिती सद
स्य खुशाल मुंढे, कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ऍड्.सुभाष जाधवर, राष्ट्रवादीचे माजी जि.प.सदस्य श्रीरामबापू मुंढे, प्रदेशाध्यक्ष राहुल जाधवर, पद्माकर मुंढे, अरुण सांगळे, प्राचार्य अवधूत जाधवर, सिध्देश्वर मुंढे, प्रशांत सोनावणे, अजित दराडे, आप्पासाहेब खोगरे, सुजित दराडे, दत्तात्रय जाधवर आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी स्व.गोपीनाथराव मुंढे यांच्या कार्याचा गौरव करुन, मुंढे साहेबांच्या स्वप्नानुसार जातीयवादी न राहता बहुजन समाजाच्या कल्याणासाठी समाजकार्य उभे करुन त्यांचे अधूरे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा व्यक्त केली. आपसातील वाद अथवा मतभेद बाजूला ठेवत बिगर राजकिय संघटना मजबुत करण्याचे प्रयत्न करण्याचे आवाहर करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गुणवंतांचा सन्मान, स्वयंरोजगार मेळावे, वधु-वर परिचय मेळावे, शेतकर्‍यांना मदत केंद्र, इतिहास संशोधन, महिला सबलीकरण, स्त्री-भृण हत्या विरोध व जनजागृती आदी कार्यक्रमांची रुपरेषा आखण्यात आली.
या बैठकीत नव्याने निवड करण्यात आलेले पदाधिकारी पुढीलप्रमाणे, प्रदेश संघटक धनंजय मुंढे, कर्मचारी आघाडी पश्‍चिम महाराष्ट्र राजाभाऊ बांगर, प.महा.युवा आघाडी अध्यक्ष संभाजी सोनावणे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष अभियंता संतोष जाधवर, उपाध्यक्ष विजय घोळवे, तालुकाअध्यक्ष रामचंद्र खराटे, उपाध्यक्ष ऍड्.दत्तात्रय मुंढे, बबन सानप, तालुका युवा आघाडी श्रीराम वाघ यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

 
Top