नळदुर्ग - जळकोट ता. तुळजापूर येथील संभाजी नगरातील जि.प प्राथमिक शाळेचा प्रथम वार्षिक  स्‍नेहसंमेलन कार्यक्रम मोठया उत्‍सहात पार पडला. चार तास चाललेल्‍या या सांस्‍कृतीक कार्यक्रमास रसिकांनी भर भरून प्रतिसाद दिला. चिमुकल्‍यांनी विविध कला सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली. 
     सांस्‍कृतीक कार्यक्रमाचे आयोजन शालेय व्‍वयस्‍थपन समितीचे अध्‍यक्ष प्रशांत  नवगिरे, मुख्‍याधापक रामदासी, यांनी केले. या कार्यक्रमास  शिवसेनेचे माजी जि.प. सदस्‍य गणेश सोनटक्‍के, तुळजाभवानी साखर कारखान्‍याचे अशोक पाटील, उपसरपंच बंकट बेडगे, संजय अंगुले, गजेंद्र पाटील , अरूण लोखंडे आदीजण यावेळी उपस्थित होते. 
आयोजित सांस्‍कृतिक कार्यक्रमात चिमुकल्या बालकांनी बाल गिते, बडबड गिते, एकांकिका, देशभक्‍तीपर गिते, भक्‍ती गिते आदी उत्‍कृष्‍टपणे  सादर केले. कार्यक्रमासाठी श्रीमती चव्‍हाण, श्रीमती रेणुके, श्रीमती क्षिरसागर, श्रीमती गायकवाड, श्रीमती जाधव, श्री. कुलकर्णी , श्री सुरवसे, व श्री. रामदासि, प्रतिभा चव्‍हाण रमाकांत सोनटक्‍के माणिक मडोळे, शोभा अंगुले, इटकरी यांनी परिश्रम घेतले.   

 
Top