उस्मानाबाद - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत  बुधवार दि. 1‍एप्रिल,2015 रोजी सकाळी 11 ते 2 या वेळेत वस्त्रशास्त्र (टेक्टाईल्स) या विषयाची पुर्नपरीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
   वस्‍त्रशास्त्र या विषयाच्या परीक्षेस फक्त अनुपस्थित असलेल्या विदयार्थ्यांसाठी या पुर्नपरीक्षचे आयोजन करण्यात आले आहे.  या परीक्षेसाठी विदयार्थ्यांनी त्यांच्या पुर्वीच्चाच परीक्षा केंद्रावर प्रविष्ठ होणे आवश्यक आहे. याची सर्व कनिष्ठ महाविदयालयाचे प्राचार्य, शिक्षक, पालक व विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन विभागीय सचिव, लातूर विभागीय मंडळ, लातूर यांनी  एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 
Top