उस्मानाबाद - प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांच्यावतीने अनुसूचित जमातीच्या विदयार्थ्यांना इ. 1 ली करीता नामांकीत इंग्रजी माध्यमांच्या शाळेत सन 2015-16 मध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. इच्छुकांनी प्रवेशासाठी आपले कागदपत्रासह 15 एप्रिल 2015 पर्यत संपर्क साधण्याचे आवाहन प्रकल्प अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
 प्रवेशासाठी विद्यार्थी हा अनुसूचित जमातीचा असावा, दारीद्रय रेषेखाली असल्यास यादीतील अनुक्रमांक त्यात नमूद करावा, विद्यार्थ्यांचे वय 5 वर्ष पुर्ण असावे, जन्म 1 जुन 2009 ते 1 जुन 2010 दरम्यान झालेला असावा. ग्रामसेवक अथवा अंगणवाडीचा जन्म तारखेचा दाखला सादर करावा, इ. 1 लीत प्रवेश घेण्यास पात्र विदयार्थ्यांची  जाहीर सूचनेव्दारे माहिती घेवून पालकांनी नजीकच्या प्रवेश शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकांमार्फत विशिष्ट कालावधीत नाव नोंदणी करावी, पालकाचे संमतीपत्र व शाळेत प्रवेशसाठी अर्ज दयावा. अर्जासोबत दोन पासपोर्ट छायाचित्र दयावेत. अर्जासोबत विदयार्थ्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र जोडावेत, आदीम जमातीच्या विद्यार्थ्यांची तसेच विधवा / घटस्फोटीत/ निराधार/ परीतक्त्या व दारीद्रय रेषेखालील कुटुंबातील अनु. जमातीच्या विद्यार्थ्याची प्राधान्याने निवड करुन त्यांना नामांकीत शाळेत प्रवेश देण्यात येईल. तसेच  विद्यार्थ्याचे पालक शासकीय निमशासकीय नोकरदार नसावेत व खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रदद करण्यात येईल. 
             विद्यार्थ्यांची निवड केल्यानंतर शाळा निश्चीत झाल्यानंतर पालकांच्या व पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. रुपये एक लाख वार्षीक उत्पन्न मर्यादा व सक्षम अधिकाऱ्यांचे जातीचे प्रमाणपत्र असलेल्या अनु. जमातीच्या इच्छुक पालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प अधिकारी, सोलापूर  यांचे दुरध्वनी क्रमांक 0217-2607600 संपर्क साधावा. विद्यार्थी व पालकांवरती अटी, शर्ती व नियम बंधनकारक आहेत.

 
Top