बार्शी - कर्मवीर ना.मा.गडसिंग (गुरुजी) मित्र विद्यालय मळेगाव येथील कु.विशाखा नागेश मोरे या विद्यार्थीनीने शासनाच्या इंटरमिजिएट चित्रकला परिक्षेत अ श्रेणीत उत्तीर्ण होऊन यश संपादन केले. शाळेतील इतर तीन विद्यार्थी ब श्रेणीत उत्तीर्ण झाले असून चित्रकला स्पर्धेत बसलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांपैकी सर्वजण उत्तीर्ण झाले आहेत. शाळेतील शिक्षीका श्रीमती यमगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक आर.एन. गव्हाणे यांनी अभिनंदन केले. बार्शीतील प्रसिध्द चित्रकार नागेश मोरे यांची कन्येस चित्रकलेत मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

 
Top