उस्मानाबाद - येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्यामुळे यात्रा कालावधीत भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी दिनांक 3 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनी कळविले आहे. 
या वाहतूक मार्गातील बदलानुसार उपरोक्त कालावधीत औरंगाबाद- सोलापूर- विजापूर ये-जा करणाऱ्या एस.टी. बसेस, इतर प्रवासी वाहने (जीप, कार आदी) सरमकुंडी फाटा, भूम, बार्शी, सोलापूर मार्गे जातील. औरंगाबाद- उस्मानाबाद-सोलापूर या मार्गावरील वाहने  इंदापूर गाव, परतापूर फाटा, मोहा, येडशी या मार्गे ये-जा करतील. कळंब-बार्शी या मार्गावरील येरमाळामार्गे होणारी वाहतूक कळंब, ढोकी, येडशी, बार्शी या मार्गे ये-जा करतील.
जड व माल वाहतूक करणारी औरंगाबाद- हैद्राबाद ये-जा करणारी वाहने मांजरसुंभा, केज, कळंब, ढोकी चौरस्ता, आळणी फाटा या मार्गे अथवा ढोकी चौरस्ता, औसा, किल्लारी, उमरगा चौरस्ता या मार्गेही ये-जा करतील. तसेच उस्मानाबाद- औरंगाबाद  या मार्गे ये- जा करणारी वाहने आळणी फाटा, ढोकी चौरस्ता, कळंब, केज, मांजरसुंभा या मार्गे ये-जा करतील. या वाहतूक बदलातून सर्व शासकीय वाहने, महत्वाच्या, अतिमहत्वाच्या व्यक्तींची वाहने तसेच अत्यावश्यक सेवांसाठीच्या वाहनांना वगळण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. 

 
Top