बार्शी (मल्लिकार्जुन धारूरकर)  भगवंत मंदिराजवळील सावळे गल्लीतील एकता ग्रुपच्या वतीने आगळ्यावेगळ्या पध्दतीने महिला दिन साजरा करण्यात आला. यामध्ये सौंदर्य रचना (मेकअप), कारले खाणे, मेजवानी या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. महिला पोलिस उपनिरीक्षक भारती वाठोरे यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलतांना वाठारे म्हणाल्या, महिलांनी स्त्री-भृण हत्या रोखल्या पाहिजेत, प्रत्येक महिलेने स्वत:चे संरक्षण स्वत:च करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अडचणीच्या प्रसंगी महिलांनी इतर महिलांना पुढे येऊन मदत केली पाहिजे. मुलींना उत्तम शिक्षण देत समाजातील वाईट प्रथा, चालीरीती, अंधश्रध्दा मोडीत काढण्याचा प्रयत्न करावा.
सौंदर्य रचना स्पर्धेत सौ.रागिनी पवार, कारले खाणे स्पर्धेत सौ.सोनाली कवडे, सौ.प्रभावती पवार, मेजवानी स्पर्धेत सौ.रेखा पवार, सौ.सुजाता पवार यांना पारितोषिके देण्यात आली. याप्रसंगी गीताई धुमाळ, हर्षदा घाडगे, वृषाली धुमाळ, साक्षी धुमाळ, शिवानी खुने यांनी आई, मी एक महिला, स्त्री-भृण हत्या या विषयांवरील कवितांचे सादरीकरण केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रुपाली कवडे, राणी धुमाळ, सोनी कवडे, रागिनी पवार, छाया पवार, अश्विनी पवार, गायत्री नेटके, सुजाता पवार, पूनम धुमाळ, यांनी विशेष परिश्रम घेतले. धनश्री पवार यांनी सुत्र संचलन केले.

 
Top