उस्‍मानाबाद -  येथे राष्‍ट्रीय समाज पक्षाच्‍या सभासद नोंदणी अभियानाचा शुभारंभ पक्षाचे महासचिव बाळासाहेब दोडतले यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.  शिवाजी चौकामध्‍ये रासपाच्‍या सभासद नोदंणी अभियाने आयोजन गुरूवार दि. 19 मार्च रोजी करण्‍यात आले होते. यावेळी उदघाटक म्‍हणून पक्षाचे संघटनमंत्री बाबूराव गडदे, जिल्‍हाध्‍यक्ष आश्रुबा कोळेकर, उपाध्‍यक्ष दादासाहेब घुले, संपर्कप्रमुख रघुनाथ वाघमोडे, कळंब तालुकाध्‍यक्ष पांडूरंग लोकरे, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावे
ळी सभासद नोंदणी अभियानाच्‍या शुभारंभ प्रसंगी दोडतले म्‍हणाले की, कार्यकर्त्‍यांनी पक्षाची बळकटी करण्‍यासाठी 19 एप्रिल पर्यंत एक लाख सभासदाची नोंदणी करावी असे अवाहन केले. या कार्यक्रमास रासपाचे परंडा तालुकाध्‍यक्ष नागनाथ नरूटे, पंडित मारकंड, शंकर ठोंबरे, सुळ महाराज, किशोर बनसोडे, लक्ष्‍मीकांत थोरात, दत्‍तात्रय सरक, तसेच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी एकाच दिवसात 1 हजार 151 सभासदांची नोंदणी करण्‍यात आली. (छाया - राहुल कोरे)

 
Top