उस्‍मानाबाद -: शहरातील रायगड फंक्‍शन हॉल येथे शनिवार दि. 21 मार्च रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्‍प सोलापूर अंतर्गत आदिवासी मुला-मुलींचे शासकीय वसतीगृह येथील विद्यार्थ्‍यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते.
या कार्यशाळेत लातूरचे अप्‍पर जिल्‍हाधिकारी डॉ. पुरुषोत्‍तम पाटोदकर, यशदा पुणेचे संशोधनाधिकारी डॉ. बबन जोगदंड, जेष्‍ठ विचारवंत डॉ. डी.टी. गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक डॉ. शहाने यांनी वस्‍तीगृहातील आदिवासी विद्यार्थ्‍यांना स्‍पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस वस्‍तीगृहाचे गृहपाल दयानंद लोणे यांच्‍यासह विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top