पांगरी (गणेश गोडसे) कोणत्याही गावात प्रवेश करताना नाक रुमालाने झाकून व गाडीच्या काचा बंद करून प्रवेश करावा लागतो . हे  आरोग्याच्या दृष्‍टीने घातक असुन किमान आपले गांव तरी निर्मलग्राम करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आसल्‍याचे सांगुन  तरुणांनी गांव निर्मलग्राम करण्यासाठी अंगिकारलेला उपक्रम खरोखरच स्तुत्य असून त्यासाठी शासन स्तरावरून आवश्यक ते सहाय्य करू असे प्रतिपादन बार्शीचे नायब तहसिलदार उत्तम पवार यांनी केले.
        कारी ता.बार्शी येथे कारी परिवर्तन सेवाभावी संस्थेने आयोजित केलेल्या ग्रामस्वच्छता  व शौचालय बांधणे जनजागृती रॅलीच्या समारोप प्रसंगी आयोजित कार्यक्रमात नायब तहसिलदार उत्तम पवार हे बोलत होते.अध्यक्षस्थानी शिवाजी वाघमारे होते.यावेळी उस्मानाबादचे नगर अभियंता भारत विधाते,विस्तार अधिकारी जे.आय.कोळी,सरपंच इम्रान मुलांनी,तंटामुक्ती अध्यक्ष अनिल कावळे,प्रा.विशाल गरड,संस्था अध्यक्ष अमोल लोहार,सचिव प्रवीण डोके आदि मान्यवर उपस्थित होते.
    राजकारण पक्षभेद,हेवेदावे आदी बाजूला ठेऊन प्रत्येकाने पुढे येऊन गावासाठी एक पाऊल पुढे टाकल्यास गाव निर्मलग्राम करणेच नव्हे तर गावचा खूप मोठा विकास होऊ शकतो असे प्रतिपादन विशाल गरड यांनी केले.
  ज्यांच्याकडे शौचालय नाही अश्यांच्या घरोघरी जावून त्यांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवून देऊन घरोघरी शौचालय कसे निर्माण होईल यासाठी जिद्दीने प्रयत्न करू असे प्रवीण डोके यांनी प्रस्ताविकात सांगितले.विविध क्षेत्रातील कर्तुत्ववान व्यक्तीसाठी संस्थेतर्फे पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल असे अध्यक्ष अमोल लोहार यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशवितेसाठी पुष्पराज यादव,संतोष जगदाळे,हरिश्चंद्र कावळे,सागर डोके,महेश व्हटकर,परीक्षित विधाते,दाऊद आतार,अविनाश कावळे,गोकुळ लोहार,प्रतीक हाजगुडे,सचिन पिंगोरे,अमोल यादव आदींनी परिश्रम घेतले.सूत्रसंचालन प्रदीप चव्हाण यांनी केले.

 
Top