उस्मानाबाद - सामाजिक न्याय विभागाने मागासवर्गीयाच्या कल्याणासाठी विविध विकासाच्या योजना राबविण्यासाठी आराखडा तयार करावा.प्रत्येक गाव व तालुक्यात सामाजिक न्यायाची समिती स्थापन करावी. मागासवर्गीयांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षण, प्रशिक्षण देवून त्यांना सक्षम करावे व त्यांचे आर्थीक जीवनमान उंचवावे, असे आवाहन  जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले.
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंती  सामाजिक समता सप्ताहानिमीत्त उस्मानाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसर, येथे रक्तदान शिबीर व व्यसनमुक्ती  कार्यक्रमात डॉ. नारनवरे बोलत होते.
यावेळी अतिरीक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पांचाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शिरीष बनसोडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.‍शितलकुमार मुकणे, डॉ. सावळे, डॉ. देशपांडे, डॉ. रसाळ, डॉ. महेश कानडे, डॉ. एस. एम. तांबारे आदि  उपस्थित होते.डॉ. नारनवरे म्हणाले की, समाजातील उपेक्षित समाजाचे आर्थीक जीवनमान उंचावण्यासाठीच सामाजिक न्याय विभागाची निर्मीती झाली आहे. सामाजिक न्याय विभागाने  मागासवर्गींयासाठी असलेल्या विविध विकासाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहचावाव्यात. त्यांना शासकीय योजनेची माहिती दयावी. मागासवर्गीय शेतकऱ्यांचे शेती गट स्थापन करावे. शेती सुधारण्यासाठी खत-बियाणे,औजाराचे वाटप करावे. मागासवर्गीयांचे प्रश्न समजावून घेवून त्या सोडवाव्यात. त्यांना मुख्य प्रवाहात आणावेत. मागासवर्गीयांवर अन्याय, अत्याचार होत असल्यास सामाजिक न्याय विभागाने तातडीने उपाय योजना करुन परीस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश दिले.
डॉ. नारनवरे म्हणाले की, मराठवाडा ही संताची भूमी आहे. मराठवाडा हा भाग वैचारीक व सांस्कृतीकदृष्टया मागासलेला नाही. अनेक संत, महात्म्यांनी  व्यसनमुक्त समाज निर्मीतीसाठी अहोरात्र कार्य केले. तरुणांनी  व्यसनाच्या आहारी जावू नये, असा मौलीक सल्लाही त्यांनी दिला.  यावेळी व्यसनमुक्ती बाबत चित्रफीत दाखविण्यात आली. रक्तदान  शिबीरात सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त श्री.‍मिनगिरे यांनी स्वत: रक्तदान करुन रक्तदानाचा शुभारंभ केला. याप्रसंगी श्री. कोरे, सामाजिक न्याय विभागाचे गवळी, अधिकारी व कर्मचारी आणि येडाई व्यसनमुक्ती केंद्र येरमाळाचे कर्मचारी, उपस्थित होते.                     
 
Top